Paris Olympic 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा सुरु झाली आहे. पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या ऑलिम्पिकचा स्पर्धेचं उद्घाटन २६ जुलै रोजी झालं. या कार्यक्रमात सहभागी देशांनी परेड केली. यामध्ये पाकिस्तानची तुकडीही सहभागी होती. मात्र, याचवेळी एका समालोचकाने लाईव्ह शोमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या तुकडीच्या आकारावर केलेल्या एका टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानची परेड सीन नदीवरून जात असताना लाईव्ह शो मध्ये एका समालोचकाने म्हटलं की, "आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तानचा संघ १८ सदस्यांसह ऑलिम्पिकमध्ये पोहोचला आहे. या १८ सदस्यांच्या संघात फक्त ७ खेळाडू आहेत तर ११ अधिकारी आहेत. पाकिस्तान हा २४ कोटी लोकांचा देश आहे. पण ऑलिम्पिकमध्ये फक्त ७ खेळाडू सहभागी होण्यासाठी आले आहेत." हेही वाचा : Paris Olympic 2024 : मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक पाकिस्तानबाबत केलेल्या या विधानाचा या कॉमेंटेटरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, पाकिस्तानने शेवटचं ऑलिम्पिक पदक १९९२ मध्ये जिंकलं होतं. आतापर्यंत पाकिस्तानचा ऑलिम्पिकमधील विक्रम जास्त काही खास नाहीत. पाकिस्तानला पहिलं पदक १९५६ मध्ये मिळालं होतं. तसेच १९९२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये शेवटचं पदक जिंकलं होतं. १९९२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या हॉकी संघानं तिसरे स्थान पटकावत कांस्यपदक जिंकलं होतं. Pakistan - a country of over 240 Million people BUT only 7 Athletes competing in #Olympics - words from the commentators of the #OpeningCeremonyShameful. Who is responsible? pic.twitter.com/sYhkOHaekn— Basit Subhani (@BasitSubhani) July 26, 2024 आता पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाकिस्तानचा पदकांचा दुष्काळ संपवतं की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पाकिस्तानने आतापर्यंत फक्त १० पदकं जिंकली आहेत. हॉकी संघाने ८ पदके जिंकली आहेत. पाकिस्तानच्या या १० पदकांमध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, अनेक पाकिस्ताच्या नागरिकांनी ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत संबधित कॉमेंटेटरबाबत नाराजी व्यक्ती केली तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.