टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वी पाकिस्तानने एकही सामना गमावला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत त्यांच्या विजयी मोहिमेला ब्रेक लावला आणि पाकिस्तानचे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, या पराभवानंतरही कप्तान बाबर आझमने सर्वांना सांभाळले. सामन्यानंतर ड्रेसिंग रुममधील त्याच्या भाषणातूनही हे सिद्ध झाले. पराभवाचे खापर कोणत्याही एका खेळाडूवर न टाकता त्याने सहकारी खेळाडूंना असे न करण्याच्या सूचना दिल्या. याचा एक व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ट्विटरवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आझम ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही निराशा होती. मात्र त्याने खेळाडूंना प्रोत्साहन दिले. बाबर म्हणाला, “दु:ख आपल्या सर्वांचे आहे, आपण काय चूक केली, कुठे चुकलो, कोणीही एकमेकांना सांगणार नाही, कारण सर्वांनाच हे माहीत आहे. त्याने खेळाडूंना सांगितले की, कोणीही कोणाला सांगणार नाही, की आपण त्याच्या चुकीमुळे हरलो. एक संघ म्हणून आपली एकता कायम ठेवायची आहे. संपूर्ण संघ खराब खेळला. म्हणूनच कोणीही कोणाकडे बोट दाखवणार नाही.”

हेही वाचा – T20 WC: “हा वर्ल्डकप आमचा होता”, पाकिस्तानच्या पराभवामुळं शोएब अख्तरला काय बोलावं ते कळेना; पाहा VIDEO

बाबर इथेच थांबला नाही. तो पुढे म्हणाला, “होय, आपण हरलो आहोत. पण हरकत नाही. या पराभवातून धडा घेऊ आणि आगामी मालिका आणि स्पर्धांमध्ये येथे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती आपण करायची नाही. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण जी जोडणी केली आहे, ती तुटू नये. एका पराभवाने आमचा संघ तुटू नये. आपण सर्वांनी आपली भूमिका बजावली आहे, एक कुटुंबासारखे वातावरण तयार केले आहे. एका पराभवामुळे ते धोक्यात येऊ नये. निकाल आपल्या हातात नसतो, पण सातत्यपूर्ण कामगिरी केली, तर आपोआप निकाल येऊ लागतील.”

बाबरकडून अलीचा बचाव

आझमने खेळाडूंना इशारा दिला, पराभवाचा दोष कोणीही एका खेळाडूवर टाकणार नाही आणि मी कोणी असे करताना पाहिले आणि ऐकले तर चांगले होणार नाही. मी त्याच्या विरोधात कसा जाईन हे सांगायची गरज नाही. वास्तविक, आझम येथे हसन अलीचा बचाव करत होता. ज्याने सामन्याच्या १९व्या षटकात मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता आणि त्यानंतर वेडने सलग ३ षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून चाहते हसन अलीला पराभवाचे खापर फोडत आहेत. ट्विटरवर त्याला खलनायक ठरवले जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan skipper babar azam dressing room speech after defeat in t20 world cup 2021 adn
First published on: 12-11-2021 at 11:05 IST