टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दरम्यानच्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. अगदी रोमहर्षक सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाच गडी आणि सहा चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यामध्ये अगदी शाहीन आफ्रिदीपासून ते हॅरिस रऊफपर्यंत कोणत्याच गोलंदाजाला फारशी कमाल करता आली नाही आणि १७५ हून अधिक धावा करुनही पाकिस्तानचा पराभव झाला.

नक्की वाचा >> पाकिस्तान आणि Scoop Shot चा ३६ चा आकडा; ‘तो’ फटका पाहून भारतीयांना लागलं ट्रोलिंगचं ‘वेड’

हॅरिसने ३ षटकांमध्ये ३२ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. हॅरिस हा या मालिकेमध्ये पाकिस्तानचा हुकूमी एक्का होता. मात्र उपांत्य सामन्यामध्ये त्याच्या गोलंदाजीचा प्रभाव न दिसल्याने सलग पाच सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचा या स्पर्धेत पहिलाच पराभव हा शेवटचा पराभव ठरला आणि संघ बाहेर पडला. संपूर्ण स्पर्धेमध्ये हॅरिसने चांगली गोलंदाजी करत ६ सामन्यांमध्ये ७.३० च्या सरासरीने ८ गडी बाद केले.

नक्की वाचा >> T20 World Cup: …अन् ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान सानिया मिर्झावरुन भारतीयांमध्येच जुंपली

हॅरिसने न्यूझीलंड संघाविरोधात शारजाहच्या मैदानामध्ये भन्नाट कामगिरी करत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. उपांत्य फेरीमधील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने हॅरिससोबतचा एक फोटो शेअर केलाय. यामध्ये दोघांनाही एकमेकांसोबत आपआपली जर्सी एक्सचेंज केलीय. दोघांच्याही चाहत्यांना हा फोटो फारच पसंत पडला आहे.

नक्की वाचा >> दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावल्याने गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “हे लज्जास्पद असून वॉर्नरने…”

हॅरिस ऑस्ट्रेलियामधील बिग बॅश लीगमध्ये मॅक्सवेल कर्णधार असणाऱ्या मेलबर्न स्टार्स संघाकडून यापूर्वी खेळला असल्याने दोघेही एकमेंकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळेच या दोघांनी अगदी अटीतटीचा सामना संपल्यानंतर आपल्या जर्सी एक्सचेंज केल्या. मॅक्सवेलनेच हा फोटो आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय आणि नंतर तो मेलबर्न स्टार्सनेही शेअर केलाय.

हॅरिसने मागील वर्षी पहिल्यांदाच बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हा त्याने सिडनी थंडर विरोधात हॅटट्रीक घेत १० सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळेही मॅक्सवेलने हॅरिसचं कौतुक केलं होतं. आता ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूने आपल्या पोस्टमध्ये, “हा (गोलंदाज म्हणून) काय करु शकतो याची काही सीमा नाहीय. हा सुपरस्टार आहे. भाषेच्या अडचणीमुळे आम्हाला त्याच्याबद्दल फारसं जाणून घेता आलं नाही. मात्र क्रिकेटच्या मैदानात त्याची कामगिरी भन्नाट आहे,” असं म्हणतो.

हॅरिसनेही मॅक्सवेलला माझ्या गोलंदाजीवर विश्वास असल्याचं म्हणत त्याचे आभार मानले आहेत.