आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटची साखळी लढत होणार आहे. दोन्ही संघांचे अंतिम लढतीत खेळण्याचे स्वप्न भंगले असले तरी या लढतीत जिंकत प्रतिष्ठा जपण्याची संधी दोन्ही संघांकडे आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर पुरेपूर सराव करण्यासाठी पाकिस्तान व श्रीलंकेचा संघ उत्सुक आहे.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,३ आणि एचडी १,३
वेळ : संध्याकाळी ७ पासून

 
‘प्रायमा ट्रक शर्यती’त भारतीय शर्यतपटू
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई<br />आंतरराष्ट्रीय दिग्गज शर्यतपटूंच्या सहभागासह २०१४ मध्ये सुरू झालेल्या ‘टी-१ प्रायमा ट्रक शर्यती’च्या तिसऱ्या पर्वात भारतीय शर्यतपटूंचाही सहभाग करण्यात आला आहे. २० मार्चला नोएडा येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर ही स्पर्धा रंगणार आहे.
सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पध्रेसाठी एकूण १७ भारतीय शर्यतपटूंची निवड केली असून, यापैकी अंतिम १२ जणांना मुख्य स्पध्रेत सहभाग घेता येणार आहे. भारतीय शर्यतपटूंसाठी ‘सुपर क्लास’ या स्वतंत्र गटाची स्थापना करण्यात आली आहे.
भारतीय खेळाडू : सय्यद अक्रम पाशा, नागार्जुन ए. (बंगळुरू), भाग चंद, रघुवीर सिंग, मोहम्मद इलियास, पदम सिंग भाटी (जोधपूर), मोहम्मद परवेझ, राजकुमार महातो, गोविंद सिंग (कोलकाता), बच्चू सिंग, जितेंद्र सिंग (जयपूर), रबिंदर यादव, बिकास महातो (जमशेदपूर), मलकित सिंग, जगत सिंग, आनंद (गुडगाव), शंकर सिंग (दिल्ली).