पाकिस्तान-विंडीज कसोटी मालिका : शाहीनमुळे पाकिस्तानची मालिकेत बरोबरी

पाकिस्तानने दिलेले ३२९ धावांचे लक्ष्य गाठताना विंडीजचा दुसरा डाव २१९ धावांत आटोपला.

किंग्स्टन (जमैका) : डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (४/४३) दुसऱ्या डावातही केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर पाकिस्तानने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजला १०९ धावांनी धूळ चारली.

पाकिस्तानने दिलेले ३२९ धावांचे लक्ष्य गाठताना विंडीजचा दुसरा डाव २१९ धावांत आटोपला. मंगळवारी चौथ्या दिवसअखेर विंडीजने १ बाद ४९ धावांपर्यंत मजल मारली होती; परंतु अखेरच्या दिवशी त्यांना आणखी २८० धावा करणे जमले नाही. विंडीजकडून फक्त जेसन होल्डरने (४७) झुंजार प्रतिकार केला.

दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यात पाकिस्तानला यश आले आहे. पहिल्या डावात सहा बळी मिळवणाऱ्या आफ्रिदीने लढतीत एकूण १० बळी पटकावत सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारावर नाव कोरले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan west indies test series akp