scorecardresearch

इंग्रजीमुळे नसीम शाहची उडाली तारांबळ; भर पत्रकार परिषदेत म्हणाला असं काही की व्हिडीओ होतोय व्हायरल

पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज नसीम शाहचा पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या इंग्रजीची तारांबळ उडाली आहे.

इंग्रजीमुळे नसीम शाहची उडाली तारांबळ; भर पत्रकार परिषदेत म्हणाला असं काही की व्हिडीओ होतोय व्हायरल
नसीम शाहचा पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.( फोटो-लोकसत्ता ग्रफिक्स टीम)

इंग्लंड तब्बल १७ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी आला आहे. यापूर्वी २००५ मध्ये संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यावर इंग्लंड संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. उद्या १ डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये रावळपिंडीत पहिला सामना सुरू होणार आहे.मात्र, या सामन्यापूर्वी संघाचा खेळाडू नसीम शाहसोबत असा एक किस्सा घडला की, ज्यामुळे सगळेच हसायला लागले.

विशेष म्हणजे, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदत पार पडली. यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिले. पण त्यानंतर पत्रकाराने त्यांला आणखी प्रश्न केला विचारला, तेव्हा नसीमने उत्तर दिले, ‘भाऊ, माझे इंग्रजी आता संपले आहे, ठीक आहे.’

जाणून घ्या संपूर्ण किस्सा –

रावळपिंडीतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने नसीम शाहला इंग्लिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनबद्दल प्रश्न विचारले. रिपोर्टरने त्याला विचारले की अँडरसन ४० वर्षांचा झाला आहे आणि रिपोर्टरने त्याला गेल्या दोन दशकांतील क्रिकेटमधील योगदानाबद्दल सांगण्यास सांगितले.

या प्रश्नाचे उत्तर देताना नसीम शाह म्हणाला की, ”ही खूप मोठी उपलब्धी आहे. कारण मी स्वतः एक वेगवान गोलंदाज आहे आणि मला माहित आहे की ते किती कठीण आहे. तो एक क्रिकेट लीजेंड आहे. त्याच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आणि आम्ही भेटल्यावर चर्चा करतो. तो ४० वर्षांचा आहे आणि अजूनही खेळत आहे आणि तंदुरुस्त आहे त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली असावी.”

नसीम शाह यांचे हे उत्तर मिळाल्यानंतर पत्रकाराने नसीम शाहला जेम्स अँडरसनच्या कौशल्याबद्दल अधिक सांगा असे विचारले असता, नसीम शाह अतिशय गमतीशीरपणे म्हणाला, ”भाऊ, मला फक्त ३० टक्के इंग्रजी येते आणि माझे इंग्रजी आता संपले आहे. ठिक आहे.”

हेही वाचा – Fifa World Cup 2022: कतारच्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; विश्वचषकाच्या तयारीत ४०० ते ५०० मजुरांचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

नसीम शाह यांचे हे उत्तर ऐकून पत्रकार परिषदेत उपस्थित सर्वजण जोरजोरात हसू लागले. पाकिस्तानी खेळाडूंना इंग्रजीमध्ये अडचण येणं ही नवीन गोष्ट नाही, याआधीही खराब इंग्रजीमुळे त्यांचे अनेक खेळाडू ट्रोल झाले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 12:13 IST

संबंधित बातम्या