Pakistan Cricket Team Penalty: टी-२० विश्वचषक २०२६ मधून पाकिस्तान सुपर-८ टप्प्यातून बाहेर पडला. या स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा परिणाम आता खेळाडूंना महागात पडणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) संघाच्या खराब कामगिरीविरुद्ध कठोर कारवाई केली आहे आणि प्रत्येक खेळाडूवर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर ही शिक्षा देण्यात आली. हा एक आश्चर्यकारक निर्णय मानला जात आहे.

पाकिस्तानला गट टप्प्यात भारताकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याशिवाय संघाने गट टप्प्यातील तिन्ही सामने खेळले. याशिवाय सुपर-८ टप्प्यात पाकिस्तानने फक्त एक सामना जिंकला. या सामन्यातही पाकिस्तानने श्रीलंकेवर निसटता विजय मिळवला. २०० अधिक धावांचं लक्ष्य श्रीलंकेने जवळपास गाठलं होतं, पण अखेरीस पाकिस्तान जिंकला. पाकिस्तानला अखेरच्या सामन्यात गणितीय समीकरणांनुसार विजय मिळवल्यास सेमीफायनल गाठणं सहज शक्य होतं. पण संघ कमी पडला.

२०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान सुपर ८ टप्प्यातून बाहेर पडला. ही सलग चौथी आयसीसी स्पर्धा आहे, ज्यामध्ये पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कारवाई करण्यास प्रवृत्त केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबीने संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाख पाकिस्तानी रुपये (अंदाजे १६ लाख भारतीय रुपये) दंड ठोठावला जाणार आहे. हा दंड विश्वचषकात सहभागी झालेल्या संघातील सर्व सदस्यांना लागू आहे.

हेही वाचा

संघावर आधीच टीका होत असल्याने पीसीबीने दिलेली ही शिक्षा आणि रक्कम खेळाडूंसाठी मोठी गोष्ट असणार आहे. पीसीबी स्वतः दंड वसूल करेल, म्हणजेच खेळाडूंना त्यांच्या पगारातून, सामन्याच्या शुल्कातून किंवा इतर देयकांमधून कपात करावी लागेल. हे पाऊल पीसीबीच्या नवीन धोरणाचा एक भाग असल्याचे दिसते, जिथे कामगिरी थेट आर्थिक अटींशी जोडली जात आहे.

खराब कामगिरीसाठी पाकिस्तान क्रिकेटवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु दंडाच्या रकमेमुळे ते अधिकच लक्ष वेधून घेत आहे. खराब कामगिरीसाठी खेळाडूंना असा दंड आकारणं बोर्डाकडून दुर्मिळ आहे.

पाकिस्तानने स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले, परंतु त्यांना स्पर्धेचा फायदा उठवता आला नाही. पाकिस्तानने नेदरलँड्सवर ३ विकेटने विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. पण, त्या सामन्यातही ते पराभवापासून थोडक्यात बचावले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेविरुद्ध ३२ धावांनी विजय मिळवला, परंतु भारतीय संघाविरुद्ध ६१ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ते कसे तरी सुपर ८ मध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले.

सुपर ८ फेरीत पाकिस्तानची कामगिरी फारशी प्रभावी नव्हती. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर त्यांना इंग्लंडकडून २ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला, परंतु नेट रन रेटमुळे पुढील फेरीत प्रवेश मिळवू शकले नाहीत.