scorecardresearch

‘रख रख के देता है, आपको भी…’, पाकिस्तानी टीव्ही अँकरने कोहलीचे कौतुक करताना हारिसला केले ट्रोल, पाहा VIDEO

Haris Rauf Viral Video: विराट कोहलीने हारिस रौफविरुद्ध खेळलेले ते दोन शॉट्स सर्वांना आजही आठवत आहेत. सध्या पाकिस्तानातही याची चर्चा आहे, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

‘रख रख के देता है, आपको भी…’, पाकिस्तानी टीव्ही अँकरने कोहलीचे कौतुक करताना हारिसला केले ट्रोल, पाहा VIDEO
विराट कोहली आणि हारिस रौफ (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टीम इंडियाचे अनेक स्टार्स असे आहेत, ज्यांचे पाकिस्तानमध्येही प्रचंड फॅन फॉलोइंग आहेत. त्या सर्वात पुढे विराट कोहली आहे. किंग विराट कोहलीचे चाहते पाकिस्तानातही मोठ्या संख्येने आहेत. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात जेव्हा विराट कोहलीने पाकिस्तानच्या हरिस रौफविरुद्ध जे दोन मनमोहक षटकार लगावले होते, तेव्हा संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले. आता एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये त्या शॉट्सचे कौतुक करण्यात आले. तसेच त्यावरुन हारिस रौफलाही ट्रोल करण्यात केले जात आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ एका टीव्ही शोमध्ये पोहोचला होता, जिथे त्याच्यासोबत एक गेम खेळला गेला. ज्यामध्ये हारिसच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला व्यक्तीची ओळख पटवण्यास सांगितले. त्यानंतर होस्टने विराट कोहलीच्या फोटोबाबत वर्णन करताना, म्हणाला की तो जगात खूप प्रसिद्ध आहे आणि दमदार धुलाई करतो. तुमची पण धुलाई करताना देखील दोन-तीन लगावले आहेत.

हे ऐकून प्रेक्षक हसतात, तसेच हारिस रौफही हसतो. ज्यानंतर हारिस तो व्यक्ती विराट कोहली असल्याचे सांगतो. या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक सामन्यात विराट कोहलीने ८२ धावांची अप्रतिम खेळी केली. या खेळीला सर्वोत्कृष्ट टी-२० खेळी देखील म्हटले जाते, ज्या दरम्यान विराट कोहलीने १९ व्या षटकात हारिस रौफला सलग दोन षटकार लगावले. ज्यांना खूप वरच्या दर्जाचे मानले जात होते.

हेही वाचा – Hardik Pandya Statement: हार्दिकने त्याच्या शानदार कर्णधारपदाचे श्रेय ‘या’ दिग्गजाला दिले; म्हणाला, ‘त्याच्यामुळे…’

हारिस रौफनेही विराट कोहलीचे कौतुक केले आणि सांगितले की तो एक महान खेळाडू आहे, त्या दिवशी त्याने खेळलेले शॉट्स संस्मरणीय होते. कदाचित तो स्वतः असे शॉट्स पुन्हा कधीच खेळू शकणार नाही, कारण ते दोन शॉट्स खूप वेगळे होते आणि दररोज असे खेळणे कठीण आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 17:29 IST

संबंधित बातम्या