Pakistan vs New Zealand, 2nd ODI: पाकिस्तान हा देशच आश्चर्यकारक असा देश आहे. कुठल्या ना कुठल्या घटनेवरून, विषयावरून ते जगभरात ट्रोल होत असतात. असच काहीसं पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत घडले आहे. जरी ते आशिया चषक आणि आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास सक्षम असले तरी त्यांना क्रिकेट सामन्याचे मुख्य नियमच माहिती नाहीत. मूलभूत गोष्टींकडे त्यांचा लक्ष नाही, हे या घटनेवरून सिद्ध होतं. शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात असेच दृश्य समोर आले. पाकिस्तान क्रिकेटच्या एका चुकीमुळे जगभरात त्यांची नाचक्की झाली आहे. थर्टी यार्ड सर्कलवरून ते ट्रोल झाले.

सामन्यात न्यूझीलंडचा डाव सुरू होताच मैदानावरील अंपायर्स अलीम दार आणि रशीद रियाझ यांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांना बोलावले आणि थर्टी यार्डचे सर्कल दुरुस्त करून घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खूप खिल्ली उडवली जात आहे. अलीम दार आणि रशीद रियाझने सामन्याच्या पहिल्या षटकानंतर लगेचच त्यांच्या निदर्शनास ही बाब समोर आली आणि त्यांनी ती ठीक करून घेतली. तोपर्यंत न्यूझीलंड संघाने त्यांच्या डावात कोणतेही नुकसान न करता ४ धावा केल्या होत्या.

Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
IPL 2024 CSK Bowler Mustafizur Rahman Return to Bangladesh to Sort visa issue for T20 World Cup
IPL 2024: चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आयपीएल सुरू असतानाच अचानक मायदेशी का परतला? काय आहे कारण

अंपायरने थर्टी यार्ड सर्कल मोजून पाकिस्तान संघाची चूक सुधारली

असे झाले की, सामन्याचे पहिले षटक टाकल्यानंतर थर्टी यार्डच्या सर्कलचे मोजमाप चुकीचे असल्याचे आढळून आले. खरेतर, हे घडले कारण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी नवीन खेळपट्टी तयार करण्यात आली होती, परंतु थर्टी यार्ड सर्कल पहिल्या साम्ण्यासारखेच ठेवण्यात आले होते. जर खेळपट्टी बदलली असेल तर त्यानुसार ते सर्कल आखून घेणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याने ते एका बाजूला जास्त आणि दुसऱ्या बाजूला कमी असे दिसत होते. मैदानावरील अंपायर अलीम दार यांना ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ कारवाई करत ते व्यवस्थित घेतले. दुसऱ्या षटकाच्या आधीच्या वर्तुळाचा आकार पुन्हा व्यवस्थित केला. थर्टी यार्ड सर्कलचे मोजमाप करण्यात आणि ते आखण्यात सहा मिनिटांचा वेळ वाया गेला. या घटनेवरून जगभरात पाकिस्तान क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा झाला.

यादरम्यान पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमला ओशाळल्या सारखे वाटत होते, सोबत माजी किवी खेळाडू ग्रँट इलियट, जो कॉमेंट्री करत होता, त्याने असेही सांगितले की, “क्रिकेटच्या मैदानावर यापूर्वी कधीही असे घडताना मी पाहिले नव्हते. हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत आहे.”

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३३६ धावा केल्या

या सामन्यातील न्यूझीलंड संघाच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करताना त्यांनी ५० षटकात ५ गडी गमावून ३३६ धावा केल्या. किवी संघासाठी डॅरिल मिशेलने १२९ धावांची उत्कृष्ट खेळी करत या मालिकेत सलग दुसरे शतक झळकावले. याशिवाय न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमनेही ९८ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना हारिस रौफने १० षटकात ७८ धावा दिल्या आणि त्याने ४ गडी बाद केले. याशिवाय नसीम शाहच्या खात्यात एक विकेट आली. या वन डे मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानी संघाने ५ विकेटने जिंकला होता.

थर्टी यार्डचे गणित काय आहे?

वास्तविक, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन पॉवरप्ले असतात. पहिला पॉवर प्ले हा १ ते १० षटकांपर्यंत असतो. त्या षटकांदरम्यान थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर जास्तीत जास्त दोन क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करण्याची परवानगी असते. ११-४० षटकांदरम्यानच्या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर जास्तीत जास्त चार क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकतात. तिसऱ्या आणि अखेरच्या पॉवर प्ले म्हणजेच ४१-५० षटकांमध्ये जास्तीत जास्त पाच क्षेत्ररक्षक तुम्हाला थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येतात.

हेही वाचा: IPL 2023: ‘… अन् रोहितच्या वाढदिवसाच्या पार्टीत युजवेंद्र चहल झाला टल्ली!’ चेहरा लपविण्याची आली वेळ, Video व्हायरल

अलीम दार यांचा सन्मान

अंपायर अलीम यांनी अलीकडेच आयसीसीच्या एलिट पॅनलमधून निवृत्ती घेतली. एलिट पॅनेल अंपायर म्हणून त्यांच्या अपवादात्मक कारकिर्दीबद्दल दार यांना सन्मानित करण्यात आले. पिंडी क्रिकेट स्टेडियमवर आयसीसीच्या सत्कार समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अलीम दार यांचा एलिट पॅनलमधील अंपायर म्हणून प्रवास नुकताच संपुष्टात आला आहे. ५४ वर्षीय अंपायरने मार्चमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा एकूण ४३५ सामन्यांमध्ये काम केल्यानंतर हे पद सोडले होते. मात्र, ते अजूनही पाकिस्तानमध्ये घरच्या सामन्यांत अंपायर म्हणून काम करू शकतात. अंपायरच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये पुन्हा स्थान मिळाल्यास त्यांना दौऱ्यावरही जावे लागू शकते.