पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिजला डेंग्यूमुळे राष्ट्रीय टी-२० क्रिकेट चॅम्पियनशिपमधून वगळण्यात आला आहे. यासोबतच तो पुढील महिन्यात यूएईमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळणार का याबद्दलही संशय व्यक्त करण्यात येत आहे. ४० वर्षीय हाफिजवर लाहोर येथील घरी उपचार सुरू आहेत. टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-२०मध्ये ९५० हून अधिक चौकार मारण्याव्यतिरिक्त हाफीजने ७ हजारांहून अधिक धावा देखील केल्या आहेत. हाफिजचे डॉक्टर म्हणाले, ‘त्यांचा संसर्ग किती गंभीर आहे यावर अवलंबून आहे. या आजारामुळे खूप अशक्तपणा येतो आणि प्लेटलेट सामान्य होण्यास एक महिना लागतो.” पाकिस्तानी संघ 14 ऑक्टोबरच्या आसपास विश्वचषकासाठी रवाना होईल. 24 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध संघाला पहिला सामना खेळायचा आहे.

हेही वाचा – IPL 2021 : ऑस्ट्रेलियन माध्यमांनी अश्विनला म्हटलं भारताचा ‘खलनायक’; शेन वॉर्नही केलं ‘असं’ ट्वीट!

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीदरम्यान मोहम्मद हाफिजने रावळपिंडीमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केली. पण प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे समजल्यावर तो लाहोरला गेला, तिथे त्याला डेंग्यू झाल्याचे कळले. मोहम्मद हाफिज शोएब मलिकनंतर पाकिस्तानच्या ज्येष्ठ खेळाडूंपैकी एक आहे.

टी-२० कारकीर्द

मोहम्मद हफीजने ३३९ सामन्यांमध्ये २६ च्या सरासरीने ७३१४ धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि ४२ अर्धशतके केली आहेत. त्याने ७४४ चौकार आणि २३४ षटकारही मारले आहेत. गोलंदाजीत हाफिजने २४च्या सरासरीने १९० विकेट्स देखील घेतल्या आहेत. ११३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये २४२९ धावा काढण्याव्यतिरिक्त हाफिजने ६० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पाकिस्तानसाठी ५५ कसोटी आणि २१८ एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistans mohammad dafeez out of national t20 with dengue doubtful for t20 world cup adn
First published on: 29-09-2021 at 18:13 IST