Premium

World Cup 2023: ‘व्हिसा’मुळे पाकिस्तानच्या विश्वचषक २०२३च्या तयारीवर टांगती तलवार, भारतात येण्याची परवानगी अद्याप नाही मिळाली

Pakistan Cricket Team Visa: पाकिस्तान क्रिकेट संघाला अद्याप विश्वचषकासाठी भारतात येण्याचा व्हिसा मिळालेला नाही, त्यामुळे बाबर आणि संघाच्या चिंतेत भर पडली आहे. संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

World Cup 2023: Pakistani team did not get visa for the World Cup plan to come via Dubai cancelled Babar-PCB worried
पाकिस्तान क्रिकेट संघाला अद्याप विश्वचषकासाठी भारतात येण्याचा व्हिसा मिळालेला नाही. सौजन्य- (ट्वीटर)

Pakistan Cricket Team Visa: भारतातील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी हैदराबादला पोहोचण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाची दुबईला जाण्याची योजना व्हिसाच्या समस्येमुळे रद्द करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार, बाबर आझम आणि त्याच्या टीमने वर्ल्डकपपूर्वी टीम एकत्र करण्यासाठी दुबईला जाण्याची योजना आखली होती, पण तसे होऊ शकले नाही. पाकिस्तानी संघ अजूनही भारतात जाण्यासाठी व्हिसा मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याने ही योजना रद्द करावी लागली. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर नऊ संघांपैकी पाकिस्तान संघ हा एकमेव संघ आहे ज्याला अद्याप व्हिसा मिळालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तान पुढील आठवड्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) ला जाणार होता आणि २९ सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यासाठी हैदराबादला रवाना होण्यापूर्वी काही दिवस दुबईत राहणार होता. अहवालानुसार, पाकिस्तानी संघ आता पुढील आठवड्यात कराचीहून हैदराबादला रवाना होऊ शकतो. पाकिस्तानचा संघ २०१२-१३ नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर येणार आहे. २०१२-१३ पासून दोन्ही देशांनी कधीही द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तान किंवा भारताला भेट दिली नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी किंवा मोठ्या स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात आणि त्रयस्त ठिकाणी. सध्याच्या पाकिस्तान संघातील केवळ दोनच खेळाडू याआधी २०१६च्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत दौऱ्यावर आले आहेत.

पाकिस्तान संघाला अद्याप वर्ल्डकपसाठी व्हिसा क्लिअरन्स मिळालेला नाही

पीसीबीच्या अहवालानुसार, पाकिस्तान संघ भारतात पोहोचण्यापूर्वी दुबईमध्ये दोन दिवस घालवणार होता. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, खेळाडू इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात असल्याने हा दुबई दौरा रद्द करण्यात आला आहे. भारतीय सरकारकडून व्हिसा मिळण्याची वाट पाहत आहेत.” पीसीबीने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) उपस्थित केला आहे.

हेही वाचा: Asian Games Opening Ceremony: आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात! कुठे पाहायला मिळणार उद्घाटन सोहळा? जाणून घ्या

सूत्रांनी सांगितले की, “पीसीबीने काल पासपोर्ट गोळा करण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना इस्लामाबादला पाठवले होते, परंतु व्हिसाची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. यामुळे आम्हाला संघाचा दुबईचा दौरा रद्द करावा लागला. योग्य वेळी व्हिसा मिळाल्यास संघ २७ सप्टेंबरला दुबईमार्गे हैदराबादला पोहोचेल.” या प्रकरणाशी परिचित असलेल्या अन्य एका सूत्राने सांगितले की, “योग्य तपासणी प्रक्रियेनंतर व्हिसा मंजूर केला जाईल. पाकिस्तानी पासपोर्ट धारकाला भारतीय व्हिसा देण्यासाठी गृह, परराष्ट्र आणि क्रीडा या तीन मंत्रालयांकडून मंजुरी घ्यावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागतो पण व्हिसा दिला जाईल.”

पाकिस्तानच्या संघात एकूण ३३ सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये खेळाडूंव्यतिरिक्त तीन राखीव खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या स्पर्धेचे यजमान आहे. मात्र, बोर्डाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पाकिस्तान आपला दुसरा सराव सामना ३ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. त्याच शहरात ६ आणि १० ऑक्टोबर रोजी नेदरलँड्स आणि श्रीलंका विरुद्ध विश्वचषक सामने खेळेल आणि त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्धच्या सामन्यासाठी अहमदाबादला उड्डाण करेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हक यांनी शुक्रवारी विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली ज्याचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे.

हेही वाचा: Virender Sehwag: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘मिस्टर ३६०’ने केलेल्या अर्धशतकावर सेहवागचे सूचक विधान; म्हणाला, “सूर्यकुमारची फलंदाजी…”

आशिया चषकात भारताविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात दुखापत झालेला स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाहची संघाला उणीव भासणार आहे. तो सामना अर्धवटसोडून मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला. आता तो वर्ल्ड कपमध्येही दिसणार नाही. क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेवर बसलेल्या त्याच्या खांद्याला दुखापत झाली. नसीमच्या जागी हसन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व शाहीन शाह आफ्रिदीकडे असेल. त्याला हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि हसन अली यांची साथ मिळेल. याशिवाय आशिया कपमध्ये खेळणाऱ्या पाकिस्तानी संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही.

ICC विश्वचषक २०२३साठी पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, सौद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, हसन अली, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर

राखीव खेळाडू: अबरार अहमद, जमान खान, मोहम्मद हारिस.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistans world cup preparations get a blow due to visa permission to enter india not yet received avw

First published on: 23-09-2023 at 18:23 IST
Next Story
Virender Sehwag: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘मिस्टर ३६०’ने केलेल्या अर्धशतकावर सेहवागचे सूचक विधान; म्हणाला, “सूर्यकुमारची फलंदाजी…”