भारताचा अव्वल स्नूकरपटू पंकज अडवाणीसह कमल चावला, चित्रा मागिमैराजन आणि अमी कमानी यांनी विजयी घोडदौड कायम राखत आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारली आहे. देशातील सर्वोत्तम गुणवान स्नूकरपटू ओळखल्या जाणाऱ्या मनन चंद्राने सलग तिसरा विजय मिळवत बाद फेरीत मजल मारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. विजेतेपदासाठी दावेदार समजल्या जाणाऱ्या अडवाणीने लकी वतनानी याचा ४-२ असा पराभव केला. चावलाने न्यूझीलंडच्या पॉल बसोन याच्यावर चौथ्या फेरीत ४-० अशी सहज मात केली. चित्राने महाराष्ट्राच्या मीनल ठाकूरला चौथ्या फेरीत ३-१ असे पराभूत केले. मुंबईच्या अमी कमानी हिने इराणच्या अक्रम मोहम्मदी अमिनीवर ३-० असा विजय साकारला. सहा गटातील प्रत्येकी चार खेळाडू बाद फेरीत स्थान मिळवणार असून चित्रा आणि अमी यांनी अंतिम २४ जणांमध्ये स्थान मिळवले आहे.

WTC Final 2023 : लंडनच्या ओव्हल मैदानात भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार, फायनलचा सामना कधी, कुठे पाहाल? जाणून घ्या