Paris Olympics 2024 French Athlete proposes boyfriend: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या सुरुवातीपासून अनेक खेळाडू आपल्या पार्टनर्सला एकमेकांना प्रपोज करताना आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत, ज्याचे फोटो व्हीडिओही समोर आले. अनेकदा पुरूष खेळाडू गुडघ्यावर बसून आपल्या पार्टनरला प्रपोज करत रिंग घालताना दिसले आहेत. पण सध्या समोर आलेल्या एका व्हीडिओमध्ये महिला खेळाडू स्टँड्समध्ये तिला चिअर करण्यासाठी आलेल्या बॉयफ्रेंडला प्रपोज करताना दिसत आहे. या व्हीडिओमध्ये एका फ्रेंच ॲथलीटने तिच्या बॉयफ्रेंडला एका गुडघ्यावर खाली उतरून जाहीरपणे प्रपोज केले आहे. हेही वाचा - Vinesh Phogat: “देशातील प्रत्येक मुलाला हे कळेल की…”, अभिनव बिंद्रा यांनी विनेश फोगटची घेतली भेट, फोटोसह शेअर केली भावुक पोस्ट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रेंच ॲथलीट ॲलिस फिनोत सहभागी झाली होती. एलिसचे ही महिलांच्या ३००० मीटर अडथळा शर्यतीत ती होती. अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या एलिसचे सुवर्णपदक निःसंशयपणे हुकले पण खेळ संपल्यानंतर तिने आयुष्यातील एक सुवर्णक्षण अनुभवला. एलिसने तिचा बॉयफ्रेंड ब्रुनो मार्टिनेझ बारगिला याला जाहीरपणे प्रपोज केले. ब्रुनो हा स्पॅनिश ट्रायथलीट आहे. दरम्यान, ॲलिस आणि ब्रुनो बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. हेही वाचा - Paris Olympic 2024 Live, Day 13 : भारतीय हॉकी संघाचे दमदार कमबॅक, कांस्यपदकाच्या लढतीत १-१ ने साधली बरोबरी पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान ॲलिसने ब्रुनोला प्रपोज केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ॲलिस तिचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. या शर्यतीनंतर, ॲलिस थेट स्टँडकडे धावते. स्टँडच्या बाहेर उभं राहून, ॲलिस तिच्या खिशातून अंगठी काढते आणि तिच्या गुडघ्यावर बसून तिच्या पार्टनरला प्रपोज करते. ॲलिसचं हे प्रपोजल पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये सर्वच जण तिला चिअर करत होते. गुडघ्यावर बसलेलं पाहून ब्रुनोही भावूक झाला आणि त्याला रडू कोसळलं होतं. ब्रुनो लगेच पुढे आला आणि ॲलिसला घट्ट मिठी मारली. हेही वाचा - Swapnil Kusale : VIDEO: स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक पदक ठेवलं दगडूशेठ गणपतीच्या चरणी "मी स्वत:ला सांगितले होते की मला नऊ मिनिटांच्या आत स्पर्धा संपवायची आहे, नऊ हा माझा भाग्यशाली क्रमांक आहे आणि आम्ही नऊ वर्षे एकत्र आहोत, त्यानंतर मी त्याला प्रपोज करेन," फिनॉटने प्रपोजलनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. ॲलिसच्या प्रपोजलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, हा इंटरनेटवरील आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, हा क्षण त्याच्यासाठी नेहमीच अविस्मरणीय असेल.