Paris Olympic 2024 7 Aug Schedule: पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा ११ वा दिवस भारतासाठी खास ठरला. आता यासोबतच ७ ऑगस्टचं वेळापत्रक कसं असेल आणि विनेश फोगटचा अंतिम सामना कधी असेल जाणून घ्या. भारताने 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने हा दिवस ऐतिहासिक ठरला. अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली महिला कुस्तीपटू आहे. विनेश फोगटने पहिल्या सामन्यात विश्वविजेती जपानच्या युई सुसाकीचा पराभव केला. भारताच्या विनेश फोगटने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव केला. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या खेळाडूचा ७-४ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत क्युबाचा कुस्तीपटूचा ५-० असा पराभव केला. दरम्यान, नीरज चोप्राने याआधीच पहिल्या थ्रोमध्ये पात्रता मिळवली आहे. नीरज चोप्राने भालाफेक पात्रता फेरीच्या गट ब मध्ये ८९.३४ मीटर पहिला थ्रो केला. हा थ्रो त्याच्या सर्वोत्तम थ्रोपेक्षा ०.६० मीटर कमी आहे. तर भारताचा अखेरच्या क्षणांमध्ये हॉकीच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. जर्मनीने भारताचा ३-२ अशा फरकाने पराभव केला. भारत त्यांचा कांस्यपदकाचा सामना ८ तारखेला खेळणार आहे.