2024 Paris Olympic Day 12 Live Updates: पॅरिस ऑलिम्पिकच्या १२व्या दिवशी भारताला सर्वात मोठा धक्का बसला. भारताची सुवर्णपदकाची दावेदार असणाऱ्या विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरवण्यात आले आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू आणि ३ हजार मी अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत असलेला अविनाश साबळे यांच्याकडून पदकाची अपेक्षा होती, पण यामध्ये भारत अपयशी ठरला. ७ ऑगस्टला रात्री उशिरा झालेल्या सामन्यांमध्ये मीराबाई चानू चौथ्या स्थानी राहिली तर अविनाशने ११व्या स्थानी राहत पॅरिस ऑलिम्पिकमधील आपली मोहिम पूर्ण केली. आता ८ ऑगस्टला भारताची नजर हॉकी संघ आणि नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर असेल. ८ ऑगस्टला भारताचं वेळापत्रक कसं असेल, जाणून घ्या.