Men's Javelin Throw Final Highlights Neeraj Chopra Won Silver : नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ८९.४५ मीटर थ्रो करत रौप्य पदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकाचा बचाव त्याला करता आला नाही, कारण यावेळी सुवर्णपदक पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे (९२.९७ मीटर थ्रो) गेले आहे. नीरज चोप्रा हा सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र नदीमने सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिक विक्रम मोडून संपूर्ण जगाला चकित केले आहे. २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पाचवे पदक आहे, याआधी भारताने ४ कांस्यपदके जिंकली होती. ज्यापैकी ३ नेमबाजीत आणि एक हॉकीत पटकावले.