Paris Olympic 2024 India July 30 Schedule: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आज म्हणजेच सोमवार २९ जुलै रोजी भारताला ३ पदके जिंकण्याची संधी होती. रविवार, २८ जुलै २०२४ रोजी मनू भाकेरच्या ऐतिहासिक कांस्यपदकानंतर, भारतीय नेमबाजी दलाला आशा होतो की त्यांचे रायफल नेमबाज रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुता आपली लय राखू शकले नाहीत आणि पदक जिंकण्याची संधी गमावली. ३० जुलैला भारताचं वेळापत्रक कसं असेल जाणून घ्या. भारताची कांस्यपदक विजेती मनू पुन्हा अचूक नेम साधताना दिसली. तिने १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत सरबजोत सिंगसह प्रवेश केला आणि कांस्यपदकाच्या सामन्यात स्थान निश्चित केले. तिरंदाजीमध्ये महिला संघाच्या खराब कामगिरीनंतर आता तिसऱ्या मानांकित पुरुष संघावर भारताची तिरंदाजी पदकाची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणण्याची जबाबदारी होती, पण त्यांनीही निराश केले. लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये आपली लय कायम ठेवाली आहे. पहिला सामना गमावलेल्या अश्विनी-तनिषाने सलग दुसरा सामना गमावला. सात्विक आणि चिरागचा सोमवारचा सामना रद्द झाला, कारण त्यांचा जर्मन प्रतिस्पर्धी मार्क लॅम्सफस दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हॉकीमध्ये हरमनप्रीत सिंग आणि त्याचा संघ अर्जेंटिनाशी भिडला आणि अखेरच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीतने गोल करत सामना बरोबरीत सुटला.