2024 Paris Olympic Highlights Day 4: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिवशी मंगळवारी (३० जुलै) मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. त्यांनी कोरियन जोडीचा पराभव केला. ट्रॅप नेमबाज पृथ्वीराज तोंडइमान पुढल्या फेरीत जाऊ शकला नाही. भारतीय हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आयर्लंडचा २-० असा पराभव केला. अर्जेंटिनाविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताला आयर्लंडसारख्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिराग या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. परंतु आजचा सामना जिंकत ही जोडी क गटात अव्वल राहिली आहे. अमित पंघाल आणि जास्मिन यांना बॉक्सिंगमध्ये पराभव पत्करावा लागला. तर भारताची भजन कौर तिरंदाजीत राऊंड ऑफ १६मध्ये पोहोचली आहे.