2024 Paris Olympic Day 5 Highlights: पॅरिस ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी म्हणजे ३१ जुलै २०२४ रोजी भारताच्या बऱ्याच खेळाडूंनी विजय मिळवत आनंदाची बातमी दिली. टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेन पॅरिसमध्ये पदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान, दीपिका कुमारीनेही महिला तिरंदाजी रिकर्व्ह प्रकारात अंतिम १६ ची फेरी गाठली. तसेच टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून आपला वाढदिवस खास बनवला. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या एम गटातून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर लक्ष्य सेनने शेवटच्या १६ मध्ये म्हणजे बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.