Paris Olympics 2024 India Day 8 Highlights : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी आठवा दिवस खूप महत्त्वाचा होता, ज्यामध्ये सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा नेमबाज मनू भाकेरवर होत्या, जिने वेगवेगळ्या शूटिंग इव्हेंटमध्ये दोन कांस्य पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडू आज नेमबाजी, तिरंदाजी, बॉक्सिंग यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. महिलांच्या २५ मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत मनू भाकेरचे पदक हुकले. त्याचबरोबर तिरंदाजीत दीपिका कुमारीचे पदका थोडक्यात हुकले आहे. अशा प्रकारे आज भारताला एकही पदक मिळाले नाही.