2024 Paris Olympic Day 9 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज नववा दिवस होता. भारताने आजच्या दिवशी दोन पदकं निश्चित केली आहेत. भारतीय हॉकी संघाने भारतीयांसाठी रविवारचा दिवस सुपर संडे बनवला आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा शूटआऊट सामन्यात रोमहर्षक पराभव केला. भारताला १० खेळाडूंसह तीन क्वार्टर सामना खेळावा लागला. शूटआऊटमध्ये भारताने हा सामना ४-२ असा जिंकला आणि उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेनला पदक निश्चित करण्याची संधी होती पण ती हुकली. ७४ किलो वजनी गटात लवलिनाला चीनच्या अव्वल मानांकित कियान हिच्याकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्याची लवलिनाची संधी हुकली. लक्ष्य सेनलाही उपांत्य फेरीचा अडथळा पार करता आला नाही. त्याचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टरशी होता. व्हिक्टर हा सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. व्हिक्टरने लक्ष्यचा २२-२०, २१-१४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.