Paris Olympic Games 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारामध्ये मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदक पटकावत इतिहास रचला. थ्री पोझिशन प्रकारामध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. स्वप्नील हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवाशी आहे. दरम्यान, स्वप्नील कुसाळे हा पॅरिसवरून आज पुण्यात दाखल झाला. यावेळी स्वप्नीलचं पुणे विमानतळावर आणि पुणे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर स्वप्नीलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं आणि आरती देखील केली. नेमबाज स्वप्नील कुसाळे याने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. यापूर्वी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये जॉयदीप कर्माकरने या स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते. हेही वाचा : Paris Olympic 2024 Live, Day 13 : नीरज चोप्रा इतिहास घडवण्यासाठी सज्ज! आज भारताच्या चौथ्या पदकावर होणार शिक्कामोर्तब? स्वप्नीलची जंगी मिरवणूक नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. यानंतर आज स्वप्नील पुण्यात दाखल झाल्यानंतर स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली. पुण्यात स्वप्नीलने काही दिवस नेमबाजीचा सराव केला होता. त्यामुळे आज स्वप्नील पुण्यात दाखल झाल्यानंतर पुण्यातील बालेवाडीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढण्यात आली. याचबरोबर स्वप्नीलचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे. #WATCH | Maharashtra: Olympic medalist Swapnil Kusale holds victory roadshow in Pune He won Bronze medal in Men's 50m Rifle in the #ParisOlympics2024. pic.twitter.com/t82ATeakNW— ANI (@ANI) August 8, 2024 स्वप्नील कुसाळे कोण आहे? स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वप्नीलने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केलं आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडलं. शूटिंगमध्ये झोकून दिल्यानंतर स्वप्नीलने मागे वळून पाहिले नाही आणि २०१३ मध्येच त्याला लक्ष्य स्पोर्ट्सकडून प्रायोजकत्व मिळालं होतं. यानंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये थ्री पोझिशन प्रकारामध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.