Paris Olympics 2024 Proposal on Badminton Court Video: ऑलिम्पिकमध्ये एका बाजूला खेळाडूंची पदकं जिंकण्यासाठी चढाओढ सुरू असते तर अनेकदा काही खेळाडू आपल्या पार्टनर्सला लग्नाची मागणी घालत त्यांना प्रपोज करतानाचे क्षणही पाहायला मिळतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरूवातीलाच अर्जेंटिनाच्या खेळाडूने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. आता असाच एक चिनी जोडप्याचा व्हीडिओ समोर आला आहे. पण ऑलिम्पिकमध्ये पदकांसाठी खेळाडूंमध्ये चढाओढही कायम आहे. दरम्यान, शुक्रवारी बॅडमिंटन कोर्टवर प्रेमाचे रंग पाहायला मिळाले. ला चॅपेल एरिना येथे मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यानंतर, लियू युचेनने त्याची सुवर्णपदक विजेती गर्लफ्रेंड हुआंग याकिओंगला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली. हेही वाचा - MS Dhoni: ‘यारी तेरी.. मुझे जिंदगी से भी प्यारी है…’ जोगिंदर शर्माने धोनीला १२ वर्षांनी भेटल्यानंतर शेअर केली खास पोस्ट चीन बॅडमिंटन स्टार हुआंग याकिओंगने पॅरिस ऑलिम्पिकमधून सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने डायमंड रिंगही जिंकली. शनिवारी ३० वर्षीय याकिओंगने झेंग सी वेईसोबत खेळत मिश्र दुहेरी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले. हे तिचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक होते. ला चॅपेल एरिना पूर्णपणे प्रेक्षकांनी भरले होते. बॅडमिंटन मिश्र दुहेरीचा पदक सोहळा आटोपल्यानंतर चीनकडून पुरुष दुहेरीत खेळणाऱ्या लिऊ युचेनने याकिओंगला प्रपोज केले. त्याने खिशातून लग्नाची अंगठी काढली आणि हुआंगला प्रपोज केले. यादरम्यान याकिओंगच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि डोळ्यातही अश्रू तरळले होते. याकिओंगने लिऊ युचेनला होकार दिला आणि बॅडमिंटन कोर्टवर चाहत्यांनीही या दोघांना चिअर करत दुजोरा दिला. हेही वाचा - Paris Olympic 2024: भारताच्या हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत रचला इतिहास, ऐतिहासिक विजयासह ५२ वर्षांचा दुष्काळ संपवला जेव्हा लियू युचेनने गुडघे टेकून तिला प्रपोज केलं, तेव्हा हुआंग भावूक झाली. या प्रपोजलनंतर, हुआंग याकिओंग म्हणाली की तिला पॅरिसमध्ये एंगेजमेंट रिंग मिळण्याची अपेक्षा नव्हती आणि ती म्हणाली की खेळाच्या तयारीवर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. "मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाहीय कारण मी खूप आनंदी आहे, आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे," हुआंग अश्रू सावरत म्हणाली. View this post on Instagram A post shared by Olympic Khel (@olympickhel) पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्याच फेरीत लिऊ युचेन बाहेर पडला. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुहेरीचे रौप्यपदक जिंकले होते. हुआंग याकिओंगलाही टोकियोमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लिऊ आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही पण हुआंगने रौप्य पदकाचा रंग बदलला आणि पहिलं सुवर्णपदक पटकावलं. पण हे पहिलं सुवर्णपदक पटकावणं आणि लग्नासाठीचं प्रपोजल तिच्यासाठी दुग्धशर्करा योग ठरला.