Paris Olympics 2024 Closing Ceremony Updates in Marathi : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेला २६ जुलै रोजी सुरुवात झाली, ज्याचा उद्घाटन समारंभ जगभरात चर्चेचा विषय बनला होता. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असून क्लोजिंग सेरेमनी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या वेळी, सीन नदीवर ऍथलीट्सची परेड आयोजित करण्यात आली होती. आता क्लोजिंग सेरेमनीही त्याच पद्धतीने होणार का, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. अखेर हा क्लोजिंग सेरेमनी कधी सुरू होणार आणि त्यात कोणत्या खास गोष्टी पाहायला मिळतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे एकत्र जाणून घेऊया.

क्लोजिंग सेरेमनी कधी आणि कुठे होणार?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा क्लोजिंग सेरेमनी फ्रान्समधील सर्वात मोठ्या स्टेडियम स्टेड डी फ्रान्समध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये एकाच वेळी ८० हजार लोक बसू शकतात. हा सोहळा भारतात १२ ऑगस्ट रोजी सकाळी १२:३० वाजता सुरू होईल, जो किमान २ तास चालेल अशी अपेक्षा आहे. क्लोजिंग सेरेमनीच्या आयोजकांनी जारी केलेल्या निवेदनानुसार पॅरिस ऑलिम्पिकच्या क्लोजिंग सेरेमनीत १०० हून अधिक कलाकार परफॉर्म करणार आहेत.

Vinesh Phogat Disqualification Case Update
Vinesh Phogat Case : विनेश फोगटच्या पदकासंदर्भात सुनावणी पूर्ण, पदक मिळणार की नाही याचा फैसला ‘या’ दिवशी होणार
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Rahul Dravid on Team Indias South Africa tour
Rahul Dravid : टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून सर्वात कठीण टप्पा कोणता होता? राहुल द्रविड यांनी सांगितले कटू सत्य
gym trainer shailesh parulekar opinion on vinesh phogat disqualification
हुकलेली ‘सुवर्ण’संधी, की चितपट झालेले ‘डावपेच’?
Saina Nehwal on Jasprit Bumrah
Saina vs Jasprit : ‘…वह मेरा स्मैश नहीं झेल पाएंगे’, सायना नेहवालचे जसप्रीत बुमराहला आव्हान? VIDEO व्हायरल
Cyber Crime
Cyber Crime : सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्याची १.५३ कोटींची फसवणूक, गोल्डन अवर्समधील कारवाई, ५० खाती गोठवली अन्…! पोलिसांनी कसा काढला युकेतील स्कॅमरचा माग?
Harmanpreet Singh, Indian hockey team, Olympic bronze medal, Paris Olympics, Sreejesh, Sports Minister Mansukh Mandaviya,
जबाबदारी वाढल्याची जाणीव; भारतीय हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंगची भावना
Vinesh Phogat Latest News
Vinesh Phogat Rajyasabha Seat: फक्त ४ दिवसांच्या फरकामुळे विनेश फोगटला राज्यसभा उमेदवारीचीही हुलकावणी; वाचा नियम काय सांगतो!

क्लोजिंग सेरेमनीत कोणकोण परफॉर्म करणार?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या क्लोजिंग सेरेमनीत ॲक्रोबॅट्स, नर्तक आणि सर्कस कलाकारांचाही समावेश असेल. एक कॉन्सर्ट होईल ज्यामध्ये स्नूप डॉग, सेलीन डायन, बिली आयलीश आणि रेड चिली पेपर्स नावाचा रॉक बँड देखील परफॉर्म करेल. जुन्या परंपरेनुसार, २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या आयोजकांना क्लोजिंग सेरेमनीत ऑलिम्पिक ध्वज दिला जाईल. याशिवाय अमेरिकन संगीतकार ‘हेर’ अमेरिकेचे राष्ट्रगीत गाताना दिसणार आहे. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच एक माहितीपटही दाखवण्यात येणार असून, त्यात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाची झलक दाखवण्यात येणार आहे. परफॉर्मन्स आकाशातही पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – Aman Sehrawat : अमन सेहरावतने ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकण्यापूर्वी अवघ्या १० तासात ४.६ किलो वजन कसे घटवले? जाणून घ्या

भारताचा ध्वजवाहक कोण असणार?

उद्घाटन समारंभात पी.व्ही. सिंधू आणि शरत कमल यांना भारतीय संघाचे ध्वजवाहक बनवण्यात आले होते. आता क्लोजिंग सेरेमनी भारतीय संघाचे ध्वजवाहक मनू भाकेर आणि पीआर श्रीजेश असतील. भाकेरने २०२४ ऑलिम्पिकमध्ये २ कांस्यपदके जिंकली आहेत, तर पीआर श्रीजेश कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.