Indian Hockey Team at Paris Olympics 2024 : भारतीय हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा पराभव करून मोठा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली. चार क्वार्टर संपल्यानंतर दोन्ही संघांचा स्कोअर १-१ असा बोरबरीत होता. ज्यामुळे निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. ज्यामध्ये भारताने ब्रिटनचा ४-२ असा पराभव केला.

या सामन्यात भारत १० खेळाडूंसह खेळत होता कारण अमित रोहिदासला दुसऱ्या क्वार्टरमध्ये रेड कार्ड मिळाल्यामुळे तो संपूर्ण सामन्यातून बाहेर पडला होता. मात्र, भारतीय संघाने हार न मानता अखेरपर्यंत ब्रिटनला कडवी झुंज दिली. अशा प्रकारे भारतीय संघाने पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारत उपांत्य फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, तर किमान रौप्यपदक निश्चित होईल. भारताचा उपांत्य फेरीचा सामना मंगळवार, ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Harvinder Singh First Gold Medal in Archery for India Dharambir Wins Gold and Pranav Surma Got Silver in Club Throw
Paris Paralympics 2024: २ सुवर्ण आणि २ रौप्य, भारताच्या पॅरा खेळाडूंनी पॅरिसमध्ये घडवला इतिहास, तिरंदाजीत पदकाला गवसणी
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Bangladesh beat Pakistan by 6 wickets
WTC Points Table : पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशची मोठी झेप, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही टाकलं मागे
Alexei Popyrin beat Novak Djokovic third round in US Open 2024
US Open 2024 : यूएस ओपनमध्ये अल्काराझपाठोपाठ जोकोव्हिचला पराभवाचा दणका, ॲलेक्सी पोपिरिनने मारली बाजी
Pakistani team cricketers trolls on social media
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तुफान ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
PAK vs BAN Saud Shakeel Statement on Mohammed Rizwan Really Denied Double Century
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानचे द्विशतक होण्यापूर्वीच शान मसूदने पाकिस्तानचा डाव का घोषित केला? सौद शकिलचे मोठे वक्तव्य
South Africa beat West Indies by 40 runs
WTC Point Table : दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानला धक्का, डब्ल्यूटीसीमध्ये झाला बदल, भारत कितव्या स्थानी?
Former cricketer Ricky Ponting opinion on the Border Gavaskar trophy sport news
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड; बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगचे मत

शूटआऊटमध्ये काय झाले?

ब्रिटनने पहिला शूटआउट घेतला आणि अल्बरी ​​जेम्सीने गोल केला.
भारताकडून पहिला शॉट घेण्यासाठी हरमनप्रीत सिंग आला आणि त्यानेही गोल केला.
ब्रिटनसाठी वॉलेसने चेंडू घेतला आणि गोल केला.
भारतासाठी सुखजीत आला आणि त्याने गोल करत स्कोअर २-२ असा बरोबरीत आणला.
तिसऱ्या प्रयत्नात क्रोनन ब्रिटनसाठी आला आणि गोल चुकला.
ललितने भारतासाठी तिसऱ्या प्रयत्नात गोल करत भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.
चौथ्या प्रयत्नातही ब्रिटनला गोल करता आला नाही आणि श्रीजेशने ब्रिटीश खेळाडूसमोर उभे राहून गोल होऊ दिला नाही.
भारतासाठी चौथ्या प्रयत्नात राजकुमारने गोल केला. अशाप्रकारे भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना पदकासह लाकडी बॉक्स का दिला जातो? त्यामध्ये नेमकं असतं तरी काय? जाणून घ्या

भारत आणि ब्रिटन यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्याच्या तिसऱ्या फेरीपर्यंत १-१ अशी बरोबरी होती. दोन्ही संघांनी प्रतिआक्रमण केले, मात्र त्यांना गोल करता आला नाही. तत्पूर्वी, हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांचा स्कोअर १-१ असा बरोबरीत होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. याचा अर्थ भारतीय संघ आता उर्वरित सामने १० खेळाडूंसह खेळावे लागले. मात्र, हरमनप्रीत सिंगने केलेल्या शानदार गोलच्या जोरावर भारताने ती मागे टाकली आणि आघाडी घेतली, मात्र ली मॉर्टनने लवकरच ब्रिटनसाठी बरोबरी साधणारा गोल केला.

रोहिदासला मिळाले रेड कार्ड –

ब्रिटनसाठी ली मॉर्टनने काउंटर ॲटॅकवर गोल केला, तर हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत २२ व्या मिनिटाला भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पॅरिस ऑलिम्पिकमधील हरमनप्रीतचा हा सातवा गोल होता. मॅच रेफ्रींनी रोहिदासला ब्रिटिश खेळाडूच्या डोक्यात जाणीवपूर्वक हॉकी स्टिकने मारल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याला रेड कार्ड देऊन बाहेर पाठवले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूला रेड कार्ड देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : भारतात पदक विजेत्या खेळाडूंना किती रक्कम मिळते, कोणत्या देशात दिले जाते सर्वाधिक बक्षीस? जाणून घ्या

भारतीय हॉकी संघाने १० खेळाडूंसह खेळत मारली बाजी –

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यांचे गोलमध्ये रूपांतर कोणीही करू शकले नाही. यादरम्यान भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने दमदार कामगिरी करत ब्रिटनचे प्रत्येक आक्रमण रोखण्यात यश मिळवले. भारताने सलग तीन पेनल्टी कॉर्नर जिंकले, पण त्यांचे गोलमध्ये रूपांतर करू शकले नाही. भारताने ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली होती आणि आता संघाला बाद फेरीतही ही गती कायम राखावी लागणार आहे. भारतीय संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरल्यास पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल.