Paris Olympics 2024 Medal Tally: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदकांच्या तालिकेत अमेरिका, चीन, फ्रान्स या देशांमध्ये पदक तालिकेत मोठी चढाओढ सुरू आहे. अमेरिकेने १०० पदकांचा टप्पाही गाठला आहे. तर पाकिस्तानने एका सुवर्णपदकासह आपले खाते उघडले. गुरुवारी (८ ऑगस्ट) भालाफेक स्पर्धेत भारताला नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, पण अर्शद नदीमने ९२.९७ मीटरची थ्रो केली. यासह नीरज आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानला केवळ १ पदक मिळाले आहे. तर भारताने ५ पदके जिंकली आहेत. नेमबाजीत ३ पदकं हॉकी आणि भालाफेकीत पदके मिळवली. पदकांची संख्या जास्त असूनही भारत मागे आहे. पाकिस्तान त्यापेक्षा ११ स्थानांनी वर झेप घेतली आहे. यावरून आता ऑलिम्पिकमध्ये देशांची क्रमवारी कशी ठरवली जाते ते जाणून घेऊया.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 14: भारताची नजर सहाव्या ऑलिम्पिक पदकावर, अमन सेहरावतच्या कुस्ती सामन्याची प्रतिक्षा

ऑलिम्पिकमध्ये पदकानुसार रँकिंगच्या निर्णयाचे निकष काय असतात?

ऑलिम्पिक खेळांमधील पदकांनुसार देशांची क्रमवारी सुवर्णपदकांच्या आधारे निश्चित केली जाते. देशाने कितीही पदके जिंकली तरी सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारा देश अव्वल स्थानावर राहतो. यामुळेच एक सुवर्ण जिंकूनही पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी १.३० वाजेपर्यंत पाकिस्तान ५३व्या तर भारत ६४व्या क्रमांकावर होता. अमेरिका अव्वल स्थानी आहे. तर अमेरिका आणि चीनमध्ये फक्त १ सुवर्णपदकाचा फरक आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra: भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राकडून वारंवार फाऊल थ्रो का होत होता? स्पर्धेनंतर स्वत: सांगितले कारण

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ५ पदकं जिंकली आहेत. नेमबाजीत ३ कांस्यपदके जिंकली आहेत. मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्यपदक जिंकून खाते उघडले. त्यानंतर सरबज्योत सिंगसह मिश्र सांघिक स्पर्धेत मनूने कांस्यपदक जिंकले. यानंतर स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले. याशिवाय भारताने स्पेनचा पराभव करत हॉकीमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यानंतर नीरजने भालाफेकीत रौप्यपदक जिंकले.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटला पदक मिळणार की नाही? याचिकेसंदर्भात आली नवी अपडेट…

Olympics 2024 Medal Tally: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येनुसार देशांची क्रमवारी
६४. भारत – ५ पदकं
५३. पाकिस्तान – ५३ पदकं
१. अमेरिका – १०३ पदकं
२. चीन – ७३ पदकं
३. ऑस्ट्रेलिया – ४५ पदकं
४. फ्रान्स – ५४ पदकं
५. ब्रिटेन – ५१ पदकं
६. दक्षिण कोरिया – २८ पदकं
७. जपान – ३३ पदकं
८. नेदरलँड्स – २५ पदकं
९. इटली – ३० पदकं
१०. जर्मनी – २२ पदकं