Luana Alonso asked to leave for her beauty at Paris Olympic 2024 : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२४ गेम्समधून बातमी आली की पॅराग्वेच्या महिला जलतरणपटूला मायदेशी परत पाठवण्यात आले. कारण ती खूप सुंदर होती आणि तिचे सौंदर्य संघातील इतर खेळाडूंसाठी 'लक्ष विचलित करणारे' होते. खरी गोष्ट काय आहे? एखाद्या खेळाडूला तिच्या सौंदर्यामुळे खरोखरच ऑलिम्पिकमधून बाहेर केले जाऊ शकते का? कोण आहे ही ॲथलीट आणि काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला तर मग जाणून घेऊया. लुआना अलोन्सो असे या तरुण महिला पॅराग्वेयन जलतरणपटूचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुआना अलोन्सो इतकी हॉट होती की टीमच्या खेळाडूंना त्यांच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करता आले नाही. तिचे सौंदर्य संघातील खेळाडूंचे लक्ष विचलित करत होते. ब्लास्टने दिलेल्या वृत्तानुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अलोन्सोने तिच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकली होती, बहुतेक पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडू आणि हे तिच्यासाठी महागात पडले, कारण तिचे सहकारी तिच्या सौंदर्यामुळे आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करु शकत नव्हते. खरं कारण काय आहे? पॅराग्वे ऑलिम्पिक समितीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की लुआना ही जलतरणपटू आहे आणि तिने १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत भाग घेतला होता, परंतु ती केवळ ०.२४ सेकंदांनी पात्रता गमावली. बुधवारी इंस्टाग्रामवर, २० वर्षीय जलतरणपटूने ऑलिम्पिक गावातून हकालपट्टी केल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या. लुआना अलोन्सोने इंस्टाग्राम स्टोरीजवर स्पॅनिशमध्ये लिहिले,"मला फक्त हे स्पष्ट करायचे आहे की मला कधीही कोठूनही काढून टाकले गेले नाही किंवा बाहेर काढले गेले नाही. त्यामुळे चुकीची माहिती पसरवणे थांबवा. मला कोणतेही विधान करायचे नाही, पण मी माझ्याबद्दल खोटे बोलू देणार नाही.” हेही वाचा - IND vs SL : असिता फर्नांडोने विराट कोहलीशी घेतला पंगा, अन् सामन्यानंतर… VIDEO व्हायरल पॅराग्वेला परतल्यानंतर अलोन्सोने जलतरणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिच्या भविष्यातील योजना काय आहेत, याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. लुआना अलोन्सो १०० मीटर बटरफ्लाय हीट्सच्या पुढे जाऊ शकली नाही. अंतिम फेरीसाठी पात्र न ठरल्यामुळे तिचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपला, तरीही खेळाडूंची इच्छा असल्यास ते समारोप समारंभापर्यंत ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहू शकतात. हेही वाचा - Swapnil Kusale : VIDEO: स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिक पदक ठेवलं दगडूशेठ गणपतीच्या चरणी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ गेम्स स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी संपणार आहे, परंतु त्याआधी त्यांना ऑलिम्पिक व्हिलेजमधील निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच अलोन्सोने जलतरणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने आपल्या चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले, परंतु ऑलिम्पिक व्हिलेज सोडण्याबद्दल अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.