लीग-१ फुटबॉल : एम्बापेच्या गोलमुळे सेंट-जर्मेन विजयी

एम्बापेने चेंडू यशस्वीरीत्या गोलजाळ्यात मारत पॅरिसला विजय मिळवून दिला.

पॅरिस : आघाडीच्या फळीतील किलियान एम्बापेने अखेरच्या काही मिनिटांत केलेल्या गोलमुळे पॅरिस सेंट-जर्मेन संघाने लीग-१ फुटबॉलच्या सामन्यात अँजर्सला २-१ असे पराभूत केले. १० सामन्यांतील नवव्या विजयासह पॅरिसने गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक भक्कम केले.

लिओनेल मेसी आणि नेयमार या प्रमुख खेळाडूंविना खेळणाऱ्या पॅरिसला या सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या अँजर्सने झुंजार खेळ केला. ३६व्या मिनिटाला अँजेलो फुलगिनीने गोल करत अँजर्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात मात्र पॅरिसच्या खेळात सुधारणा दिसली. ६९व्या मिनिटाला डॅनिलो परेराने केलेल्या गोलमुळे पॅरिसने सामन्यात बरोबरी साधली. यानंतर मावरो इकार्डीने मारलेला फटका पिएरिक कॅपेल्लेच्या हाताला लागल्याने पॅरिसला ८७व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. एम्बापेने चेंडू यशस्वीरीत्या गोलजाळ्यात मारत पॅरिसला विजय मिळवून दिला.

लिव्हरपूलचा दमदार विजय रॉबटरे फर्मिन्होने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये वॉटफर्ड संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. फर्मिन्होने अनुक्रमे ३७, ५२ आणि ९०+१ मिनिटाला गोल केले. त्याला साडिओ माने (९वे मिनिट) आणि मोहम्मद सलाह (५४ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून उत्तम साथ दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Paris saint germain beat angers 2 1 in a ligue 1 football match zws

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या