सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पार्थिवने निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. भारतीय संघाचा सर्वात तरुण यष्टीरक्षक आणि यष्टींमागच्या आपल्या हालचालींमुळे पार्थिव नेहमी चर्चेत असायचा.

३५ वर्षीय पार्थिव पटेलने आतापर्यंत २५ कसोटी, ३८ वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय संघाकडून पार्थिवला फारशी संधी मिळाली नसली तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरातचं १९४ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. २००२ साली वयाच्या १७ व्या वर्षी पार्थिव पटेलने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

सुरुवातीची काही वर्ष चांगला खेळ केल्यानंतर पार्थिवच्या कामगिरीत घसरण झाली. यानंतर २००४ साली दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीच्या आगमनानंतर पार्थिवने संघातली आपली जागा गमावली. भारतीय संघाकडून संधी मिळत नसली तरीही आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिव खेळत होता.