Pat Cummins has been ruled out of the ODI series:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी कांगारू संघाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक संघाचा कर्णधार पॅट कमिन्स या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या आईचे नुकतेच निधन झाले होते, त्यामुळे तो इंदोर आणि अहमदाबाद कसोटीतही संघाचा भाग नव्हता. त्याच्या जागी संघाची सूत्रं पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथच्या हाती सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे तो आगामी वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करणार आहे.

स्टीव्ह स्मिथ कर्णधार असेल –

संघाचा वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्सच्या बाहेर पडल्यानंतर आता संघाची कमान अनुभवी क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथच्या हाती आली आहे. स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येही त्याने भारताविरुद्ध शानदार नेतृत्व केले. ज्यामध्ये एक सामना जिंकला आणि दुसरा ड्रॉ करण्यात यशस्वी झाला.

Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित
India Australia first Test match likely to be held in Perth sport news
भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पर्थला?

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी पॅट कमिन्सच्या बाहेर पडण्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी पॅट कमिन्स मार्चमध्ये परतणार नसल्याचे म्हटले आहे. आईच्या मृत्यूनंतरही तो स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मॅकडोनाल्ड असेही म्हणाले की, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडू त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठिशी आहेत.’

शेवटच्या ५ वनडेत चार कर्णधार –

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाबद्दल बोलायचे झाले तर, चार वेगवेगळ्या खेळाडूंनी गेल्या ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध अॅरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला कर्णधार बनवले होते, मात्र त्याच्या अनुपस्थितीत जोश हेझलवूडला संघाची जबाबदारी सांभाळावी लागली. आता भारताविरुद्ध स्टीव्ह स्मिथकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: दिलदार स्मिथ! विराट कोहली बाद झाल्यानंतर स्वत:हून पुढे आला; अन्…, पाहा VIDEO

कर्णधार म्हणून स्मिथची फलंदाजी कशी राहिली आहे?

स्टीव्ह स्मिथने कर्णधार म्हणून ५१ एकदिवसीय सामन्यांच्या ५० डावात १९८४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ४५.०९ आणि स्ट्राईक रेट ८४.९६ होता. ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार असताना त्याने ५ शतके आणि १२ अर्धशतके केली आहेत. जर आपण स्टीव्ह स्मिथच्या एकूण एकदिवसीय विक्रमावर नजर टाकली तर त्याने एकूण १३९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १२४ डावांमध्ये त्याने ४५.११च्या सरासरीने आणि ८७.६४च्या स्ट्राइक रेटने ४९१७ धावा केल्या आहेत. म्हणजेच भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत स्मिथला वनडेत ५ हजार धावा पूर्ण करण्याची संधी असेल.

वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ –

ऑस्ट्रेलिया संघ स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झाम्पा