मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) सुरू होणाऱ्या चौथ्या अॅशेस कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर, जायबंदी नेथन लायनच्या जागी संघात टॉड मर्फीला स्थान देण्यात आले आहे.
मर्फी बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) सामन्यात तो ऑस्ट्रेलियात आपला पहिला कसोटी सामना खेळण्यास तयार आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात मॅट कुनमन आणि कोरी रोकिचिओली ऐवजी मर्फीला प्राथमिकता देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने अॅडलेड येथील तिसरा कसोटी सामना जिंकत अॅशेस कायम राखली आहे. जूनपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या कमिन्सने तिसऱ्या कसोटी पुनरागमन केले होते. मात्र, पुढील कसोटीसाठी त्याला विश्रांती देण्यात येईल. स्टीव्ह स्मिथ अस्वस्थ असल्याने तिसऱ्या कसोटी सामना खेळू शकला नाही. मात्र, तो आता ठीक असण्याची अपेक्षा आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत तो पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल. झाय रिचर्डसनला संघात स्थान देण्यात आले आहे.
संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅरी, ब्रेंडन डॉगेट, कॅमेरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लबूशेन, टॉड मर्फी, मायकल नेसर, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, जेक वेदराल्ड, ब्यू वेबस्टर.
