Pat Cummins Statement On Defeat Against South Africa In WTC Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजयाची नोंद केली. हा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी अतिशय खास ठरला आहे. कारण गेल्या २७ वर्षांत दक्षिण आफ्रिकेला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी गमावली. दरम्यान या पराभवानंतर काय म्हणाला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार? जाणून घ्या.

या पराभवानंतर बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, ” गोष्टी खूप लवकर बदलू शकतात, पण दुर्दैवाने आमच्यासाठी हे थोडं अवघड होतं. आम्हाला पहिल्या डावात चांगली आघाडी मिळाली होती. आम्ही त्यांना सामन्यातून बाहेर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण तसं होऊ शकलं नाही. गेली दोन वर्ष सर्वकाही चांगलं होतं. पण या सामन्यात तसं काही घडलं नाही.”

पॅट कमिन्सने विरोधी संघातील खेळाडू एडेन मारक्रमचं कौतुक केलं. तो म्हणाला, ” या सामन्यात नॅथन लायन धोकादायक ठरू शकला असता, पण त्याला विकेट मिळाली नाही. एडेनने अप्रतिम खेळी केली. दक्षिण आफ्रिका संघ खऱ्या अर्थाने विजेता ठरला आहे. त्यांनी स्वतःला शेवटपर्यंत सामन्यात टिकवून ठेवलं आणि संधी मिळताच संधीचं सोनं केलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला २१२ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने ६६ तर बेवस्टरने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला १३८ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ७४ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरूवात करता आली नाही. अवघ्या ७३ धावांवर दक्षिण आफ्रिकेचे ७ फलंदाज तंबूत परतले होते. शेवटी मिचेल स्टार्कने अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना एडेन मारक्रमन शतकी आणि बावूमाने अर्धशतकी खेळी करत संघाला ५ गडी राखून विजय मिळवला.