PAK vs BAN 1st Test Shan Masood Controversy: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. पहिला सामना रावळपिंडीत खेळवला जात असून ओल्या आउटफिल्डमुळे नाणेफेकीला उशीर झाला. अगदी सुरुवातीलाच पाकिस्तानची आघाडीची फळी ढासळली आणि यजमान संघाने अवघ्या १६ धावांवर तीन विकेट गमावल्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याचा बांगलादेशचा कर्णधार नझमुल शांतोचा निर्णय शरीफुल इस्लाम आणि हसन महमूद यांनी अगदी सिद्ध केला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद ६ धावा करत बाद झाला पण त्याच्या विकेटवरून आता वाद सुरू झाला आहे.

हेही वाचा – ICC Test Rankings: ICC ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंचा दबदबा, अश्विन-जडेजा पहिल्या स्थानी तर रोहित-विराट…

PAK vs ENG Ben Stokes on Babar Azam
PAK vs ENG : ‘तो पाकिस्तान क्रिकेटचा…’, बाबर-शाहीन आणि नसीम यांना संघातून डच्चू देण्यावर बेन स्टोक्स काय म्हणाला? पाहा VIDEO
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
PAK vs ENG PCB upset on Fakhar Zaman post
PAK vs ENG : बाबरला साथ, विराटचं गुणगान यामुळे पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूवर होऊ शकते खप्पामर्जी; जाणून घ्या घटनाक्रम
PAK vs ENG Fakhar Zaman on Babar Azam was dropped from Pakistan's Test team
PAK vs ENG : बाबर आझमला वगळल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर संतापला, पीसीबीला दिले विराट आणि भारताचे उदाहरण
IND W vs PAK W match Harmanpreet Kaur Injury Video viral
Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल
no india pakistan bilateral talks during sco meet says s Jaishankar
पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही : जयशंकर
Pakistan test captain Shan Masood on Virat Kohli
VIDEO : ‘विराटपेक्षा ‘या’ २४ वर्षीय खेळाडूचा रेकॉर्ड चांगला…’, पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराचे वक्तव्य
India response to Pakistan in the United Nations General Assembly
दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील! संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर

पाकिस्तानच्या फलंदाजीची सुरूवात फारच खराब झाली. दोन्ही सलामीवीर आणि महत्त्वाचा फलंदाज असलेला बाबर आझम स्वस्तात बाद झाला. हसन महमूदने प्रथम पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफीकला २ धावांवर झाकीर हसनकरवी झेलबाद केले. यानंतर शरीफुल इस्लामने पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदला लिटन दासकडे झेलबाद करून पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम आपले खातेही उघडू शकला नाही. मात्र, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदला ज्या पद्धतीने आऊट देण्यात आले, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा – Gautam Gambhir: गौतम गंभीरने निवडली ऑल टाईम इलेव्हन; पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना मिळालं स्थान

नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानी संघ प्रथम फलंदाजीला आला आणि दुसरा धक्का शान मसूदच्या रूपाने बसला. पहिल्या दिवसाच्या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर शान मसूदला झेलबाद देण्यात आले. शरीफुल इस्लामचा चेंडू हा शॉट ऑफ लेन्थ डिलीव्हरी होता. हा आत आलेला चेंडूवर मसूदने बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण बॅट आणि पॅडला चेंडू लागत थेट यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये गेला. बांगलादेशच्या खेळाडूंनी यावर जोरदार अपील केले, परंतु मैदानावरील पंचांनी त्याला बाद आऊट दिले नाही, त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शांतोने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – BCCI Earnings: IPL 2023 मुळे BCCI मालामाल, तब्बल ५,१२० कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई, पण GST तब्बल…

बांगलादेशने रिव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये दिसून आले की अल्ट्राएजवर स्पाइक आहे. पण हा स्पाइक चेंडू बॅट जवळून गेल्यानंतर फ्रेमवर आली होती. मात्र, तरीही थर्ड अंपायरने शान मसूदला बाद घोषित केले. अंपायरच्या या निर्णयाने शान मसूद नाखूश होता, पण त्याला माघारी जावे लागले. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार प्रशिक्षकाला हीच गोष्ट सांगताना दिसला. जर आपण एलबीडब्ल्यूबद्दल बोललो, तर चेंडू इम्पॅक्ट ऑफच्या बाहेर होता, अशा परिस्थितीत एलबीडब्ल्यू आऊट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

पाकिस्तान-बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यातमायकल गॉफ थर्ड अंपायर होते. या निर्णयामुळे थर्ड अंपायर मायकल गॉफ पाकिस्तानी चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. कदाचित त्यांनी निकाल देण्याची थोडी घाई केली असं चाहत्यांच म्हणणं आहे. नंतर शान मसूद ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या बाद झाल्याचा रिप्ले पाहताना दिसला.