Ruturaj Gaikwad Wicketkeeping Video Viral : सध्या जगभरात आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. दरम्यान याच कालावधीत पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम खेळला जात आहे. आता या स्पर्धेतील पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड छत्रपती संभाजी किंग्जविरुद्धच्या सामन्यात एका नवीन भूमिकेत दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजी किंग्जविरुद्धच्या सामन्यात पुणेरी बाप्पाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड विकेट कीपिंग करताना दिसला. इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ऋतुराज डायव्हिंग करत चेंडू पकडताना दिसत आहे. आयपीएल २०२४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवणारा ऋतुराज गायकवाड यष्टिरक्षण करत असल्याचे पाहून, तो एमएस धोनी निवृत्त झाल्यानंतर विकेटकीपिंग करेल, असा अंदाज बांधला जात आहे.

Sahil Chauhan Smashes Fastest T20I Century in just 27 Balls
Fastest T20I Century: वर्ल्डकप सुरू असतानाच टी-२० क्रिकेटमध्ये झाला मोठा रेकॉर्ड, इस्टोनिआच्या साहील चौहानने झळकावलं वेगवान टी२० शतक
Panipat murder wife and lover arrested
जिम ट्रेनरशी पत्नीचे सूत जुळले, दोघांनी मिळून पतीला संपवलं; अडीच वर्षांनी पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
Jay Shah on Rohit Sharma captaincy
टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”
Rohit Sharma Stump Mic Upar Dega to Deta hai na Said to Suryakumar Yadav And Hits Six
IND vs ENG: “उपर डाला तो देता हूं ना…” हिटमॅन शब्दाचा पक्का, रोहितने सूर्याला सांगून लगावला दणदणीत षटकार; VIDEO व्हायरल

मात्र, याबाबत आताच घाईने कोणताही अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही. कारण आयपीएलसारख्या स्तरावर विकेटकीपिंग करणे सोपे नाही. या स्पर्धेत बऱ्याच खेळाडूंनू अर्धवेळ विकेटकीपरची जबाबदारी पार पाडली आहे. ज्यामध्ये अंबाती रायडूने मुंबई इंडियन्सच्या अर्धवेळ विकेटकीपरची भूमिका पार पडली आहे

हेही वाचा – T20 WC 2024 : भारतीय संघाला मोठा धक्का! सुपर ८ फेरीपूर्वी टी२० जागतिक क्रमवारीतील अव्वल फलंदाजाला दुखापत

ऋतुराज गायकवाडने शानदार फॉर्ममध्ये –

ऋतुराज गायकवाड विकेटकीपिंग करतानाचा व्हिडिओ स्पोर्ट्स १८ ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला होता. त्याचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता. ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ मध्ये बॅटने चांगली कामगिरी केली आहे. त्याने ८ सामन्यांच्या ७ डावात १६८.६० च्या स्ट्राईक रेटने आणि ४८.३३ च्या सरासरीने २९० धावा केल्या आहेत. ज्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा – T20 WC 2024 : ‘संघात एकता नाही, अन् कौशल्याच्या बाबतीत जगाच्या मागे…’, गॅरी कर्स्टनने पाकिस्तानचे काढले वाभाडे

ऋतुराज गायकवाडच्या संघाची अवस्था बिकट –

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ मधील ऋतुराज गायकवाडच्या संघाबद्दल बोलायचे, तर त्याचा संघ सहा संघांमध्ये सहाव्या स्थानावर आहे. पुणेरी बाप्पाने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. त्यांना ६ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. रत्नागिरी जेट्स ९ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ९ पैकी ५ सामने जिंकून कोल्हापूर टस्कर्स दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजी किंग्ज ९ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. ईगल नाशिक टायटन्स ९ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. रायगड रॉयल्स ८ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.