आयपीएल २०२६ स्पर्धेतील २९ वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकला आणि पंजाबला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या निर्णयाला मान देत पंजाबच्या फलंदाजांनी लखनौच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलामीला फलंदाजी करताना प्रियांश आर्यने ९३ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान अर्धशतक पूर्ण करताच त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
युवराज सिंगच्या तालमीत घडलेला प्रियांश आर्य तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याच्या फलंदाजीचा रुद्रावतार पाहायला मिळाला. प्रभसिमरन सिंग शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता. त्यानंतर प्रियांश आर्यने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि अवघ्या १९ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळेस २० पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी आहे. अभिषेक शर्माने ६ वेळा असा कारनामा केला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळेस २० पेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारे भारतीय फलंदाज
अभिषेक शर्मा- ६ वेळेस
प्रियांश आर्य- ३ वेळेस
वैभव सूर्यवंशी- ३ वेळेस
रजत पाटीदार- २ वेळेस
यशस्वी जैस्वाल- २ वेळेस
इशान किशन- २ वेळेस
केएल राहुल- २ वेळेस
पंजाबची दमदार सुरुवात
या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. पहिल्याच षटकात पंजाबला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. प्रभसिमरन सिंग शून्यावर माघारी परतला. त्यानंतर कुपर कॉनोली आणि प्रियांश आर्यने लखनौच्या गोलंदाजांची चांगीलीच धुलाई केली. कुपर कॉनोली आणि प्रियांश आर्यनेत एडन मारक्रमच्या एकाच षटकात एकूण ३१ धावा कुटल्या. पावरप्लेमध्ये पंजाबची धावसंख्या १ गड बाद ६३ धावा इतकीच होती. पण त्यानंतर पंजाबने ९ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १८५ धावांची भागीदारी केली. कुपर कॉनोली आणि प्रियांश आर्य या दोघांनाही शतक झळकावण्याची संधी होती. पण कुपर ८७ तर प्रियांश ९३ धावांवर माघारी परतला.
