PBKS vs MI Dharamshala Match Update IPL 2026: आज १४ मे रोजी आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे, तर पंजाब किंग्सला गेल्या सलग चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पंजाबला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा मार्ग दोन्ही सामने जिंकणं. मुंबई इंडियन्सला हरवणं हे त्यांचं सर्वात मोठे आव्हान असेल. पण यादरम्यान मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना रद्द होणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवला जाईल. पंजाब किंग्सने याच मैदानावर मागील सामना गमावला होता. हे त्यांचे घरचे मैदान असून, आता ते या मैदानावरील आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करतील.
आरसीबीविरूद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यासाठी धरमशालासाठी रवाना झाला. दोन्ही संघांच्या सराव सत्रामधील व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. पण याचदरम्यान वरूण राजाने देखील धरमशालामध्ये जोरदार हजेरी लावली आहे. धरमशालामध्ये सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता आहे. अॅक्युवेदरनुसार, धरमशालामध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान पाऊस पडण्याची ४०-६०% शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यासाठी ही अजिबातच चांगली बातमी नसणार आहे. भले या सामन्यादरम्यान पावसाची अपेक्षा नाही, परंतु जर मैदान सलग ६-७ तास ओलं राहिलं, तर सामनाधिकारी आणि पंच ते खेळासाठी योग्य मानणार नाहीत. त्यामुळे ओल्या आऊटफिल्डमुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.
पंजाब-मुंबई सामना रद्द झाला तर काय होणार?
आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सने आतापर्यंत सहा सामने जिंकले असून, त्यांचा एक सामना रद्द झाला आहे. परिणामी, त्यांचे १३ गुण आहेत. जर सामना रद्द झाला, तर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांना प्रत्येकी एक गुण मिळेल. पंजाब किंग्स संघाला प्लेऑफ गाठण्यासाठी सध्याच्या घडीला दोन गुण मिळवणं महत्त्वाचं असणार आहे. आरसीबी व गुजरात हे संघ १६ गुणांसह पहिल्या-दुसऱ्या स्थानी असून त्यांचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. तर हैदराबादचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
या तीन संघांशिवाय चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स हे दोघेही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. त्या दोन्ही एका संघानेही आपले उर्वरित सर्व सामने जिंकले तर पंजाबला मागे टाकून ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. त्यामुळे पंजाब संघाला मुंबईविरूद्धचा सामना जिंकण्यासाठी पूर्ण खेळवला जाणं अतिशय आवश्यक असणार आहे.
