PBKS vs MI : आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५८ वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. पण पंजाबसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पंजाबने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. २०१ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईला चांगली सुरुवात मिळाली. रायन रिकल्टने दमदार सुरुवात करुन दिली. शेवटी तिलक वर्मा नाबाद राहिला आणि मुंबई इंडियन्सला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

Live Updates
23:01 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live; मुंबईला मोठा धक्का! रुदरफोर्ड परतला माघारी

मुंबईला मोठा धक्का बसला आहे. शेरफेन रुदरफोर्ड २२ धावा करून माघारी परतला आहे.

22:26 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live: चहलच्या भन्नाट बॉलवर रोहितची दांडी गुल! मुंबईचे टॉप ३ फलंदाज तंबूत

मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा धक्का बसला आहे. चहलच्या गोलंदाजीवर रोहित २५ धावा करून माघारी परतला आहे.

22:19 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live: मुंबईचे २ फलंदात तंबूत! नमन धीर परतला माघारी

मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. नमन धीर ९ धावा करून माघारी परतला आहे.

22:05 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live: मुंबईला पहिला मोठा धक्का! अर्धशतकाच्या जवळ असताना रिकल्टन परतला माघारी

मुंबईला चांगली सुरुवात मिळाली होती. पण रायन रिकल्टन ४८ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

22:00 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live: मुंबईची वेगवान सुरुवात! पावरप्लेमध्ये रोहित-रिकल्टनची तुफान फटकेबाजी

या सामन्यापत २०१ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने पावरप्लेमध्ये ५९ धावा केल्या आहेत.

21:19 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live Score: प्रभसिमरन सिंगचं दमदार अर्धशतक! पंजाबने मुंबईसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाबने २० षटकांअखेर २०० धावा केल्या आहेत. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी २०१ धावांची गरज आहे.

20:49 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live: पंजाबला सहावा धक्का! शशांक स्वस्तात परतला माघारी

पंजाब किंग्स संघाचे ६ फलंदाज माघारी परतले आहेत. शशांक सिंग अवघ्या २ धावांवर माघारी परतला आहे.

20:40 (IST) 14 May 2026

PBKS vs MI, IPL 2026: राज अंगद बावा, काय कॅच घेतलाय 'भावा'! पंजाबचा निम्मा संघ तंबूत

सूर्यांश शेडगेला बाद करण्यासाठी राज अंगद बावाने भन्नाट कॅच घेतला आहे. सूर्यांश अवघ्या ८ धावा करून माघारी परतला आहे.

20:32 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live: पंजाबला चौथा धक्का

पंजाब किंग्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कुपर कॉनोली अवघ्या २१ धावांवर माघारी परतला आहे.

20:30 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live: एकाच षटकात पंजाबला २ मोठे धक्के! मुंबईचं दमदार कमबॅक

पंजाब किंग्स संघाला एकाच षटकात २ मोठे धक्के बसले आहेत. आधी प्रभसिमरन सिंग ५७ धावा करून, त्यानंतर श्रेयस अय्यर अवघ्या ४ धावांवर माघारी परतला आहे.

19:58 (IST) 14 May 2026

PBKS vs MI LIVE: दीपक चहरने मिळवून दिला ब्रेकथ्रू

दीपक चहर पॉवरप्लेमधील अखेरचं षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने तिसऱ्या चेंडूवर प्रियांश आर्यला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. प्रियांश २४ धावा करत बाद झाला. यासह पंजाबने पॉवरप्लेमध्ये १ बाद ५५ धावा केल्या आहेत.

19:43 (IST) 14 May 2026

PBKS vs MI Live: ३ षटकांत पंजाबने केल्या इतक्या धावा

पंजाब किंग्सकडून प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंगची जोडी फलंदाजीला उतरली आहे. तर मुंबईकडून दीपक चहर जसप्रीत बुमराह या गोलंदाजीने जोडीने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. मुंबईने चांगली सुरूवात केली असून पंजाबने ३ चेंडूत बिनबाद २१ धावा केल्या आहेत.

19:09 (IST) 14 May 2026

मुंबई विरुद्ध पंजाब- दोन्ही संघ असे आहेत

पंजाब किंग्स- प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कोनोली, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, अझमतुल्ला ओमरझाई, मार्को यान्सन, झेव्हियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

बेंच- विजयकुमार व्यशक, हरप्रीत ब्रार, मिचेल ओवेन, विष्णू विनोद, प्रवीण दुबे

मुंबई इंडियन्स- रायल रिकलटन, नमन धीर, शेरफन रुदरफोर्ड, तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कार्बिन बॉश, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, रघू शर्मा

बेंच- रोहित शर्मा, मयांक रावत, रॉबिन मिन्झ, क्रिश भगत, ट्रेंट बोल्ट

19:05 (IST) 14 May 2026

मुंबईने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय

मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार जसप्रीत बुमराहने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या लढतीसाठी उपलब्ध नाहीत.

18:54 (IST) 14 May 2026

बुमराह ठरणार दहावा कर्णधार

हरभजन सिंग, शॉन पोलॉक, सचिन तेंडुलकर, ड्वेन ब्राव्हो, रिकी पॉन्टिंग, रोहित शर्मा, कायरेन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या या कर्णधारांच्या यादीत आता बुमराहचं नाव समाविष्ट होणार आहे.

18:52 (IST) 14 May 2026

जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार

हार्दिक पंड्या दुखापतीतून न सावरल्याने आणि सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणास्तव मुंबईला परतल्याने पंजाबविरुद्ध जसप्रीत बुमराह नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.

18:51 (IST) 14 May 2026

वादळाने पाळण्यासह छत उडाले, बालकाचा मृत्यू

जत तालुक्यातील खलाटी येथे घराचे पत्रा उडाल्याने पाळण्यातील एका नऊ महिन्यांच्या बालकाचा फेकले गेल्याने मृत्यू झाला. ...अधिक वाचा
18:51 (IST) 14 May 2026

प्लेऑफसाठी पंजाबला विजय आवश्यक

दमदार सुरुवात करणाऱ्या पंजाबची गाडी घसरली आहे. पराभवाची मालिका थांबवत प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यादृष्टीने पंजाबला मुंबईविरुद्ध विजय आवश्यक आहे.