वृत्तसंस्था, लाहोर

पाकिस्तानातील केंद्रांचे नूतनीकरण संथगतीने सुरू असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चिंतित असून आगामी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धा पाकिस्तानबाहेर खेळविण्याचा विचार करत असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र, पाकिस्तानातील स्टेडियमबाबत उभे करण्यात आलेले चित्र योग्य नसून चॅम्पियन्स करंडकाची तयारी प्रगतिपथावर असल्याची ग्वाही पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) शुक्रवारी देण्यात आली.

Why Shiv Sainik Dug Wankhede Pitch in 1991 by Orders of Balasaheb Thackrey Before India vs Pakistan Match
Wankhede Stadium: बाळासाहेबांचा इशारा अन् शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच खोदलं, पाकिस्तान बरोबरच्या ‘त्या’ सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Pakistan preparations for Champions Trophy slow sport news
चॅम्पियन्स करंडकाची तयारी पाकिस्तानकडून संथगतीने; बहुतेक केंद्रांचे नूतनीकरण अपूर्णच
Champions Trophy 2025 All Venues in Pakistan Lahore Rawalpindi Karachi Are Still Not Ready Tournament Could Shift to UAE
Champions Trophy: पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीची हौस भारी; पण स्टेडियम्स बांधून तयारच नाही, यजमानपद दुबईकडे जाण्याची शक्यता
devendra Fadnavis announces Nandini Swastishree Math will get pilgrimage A status and facilities
नांदणी मठाला तीर्थक्षेत्र दर्जा; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
bangladesh and pakistan establish military tie up what are implications for india
बांगलादेशच्या भूमीवर पुन्हा पाकिस्तानचे सैन्य… दोन अस्थिर शेजाऱ्यांमधील करार भारतासाठी डोकेदुखी ठरणार?
rajan Salvi
Rajan Salvi : नाराजीच्या चर्चेवर राजन साळवींचं स्पष्टीकरण; पक्षांतराबाबत म्हणाले…

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील बहुतांश सामने पाकिस्तानात, तर भारताचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. मात्र, पाकिस्तानातील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, लाहोरचे गद्दाफी स्टेडियम आणि कराची येथील नॅशनल बँक स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ‘आयसीसी’ला आता ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर हलविण्याबाबत विचार करावा लागत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, स्टेडियमच्या नूतनीकरणाबाबत ‘पीसीबी’ आणि ‘आयसीसी’ निश्चिंत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>Donald Trump : ‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा! सर्व आरोपातून झाली बिनशर्त सुटका

‘पीसीबी’मधील सूत्राच्या माहितीनुसार, प्रसारणकर्ते आणि अन्य प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ‘आयसीसी’च्या पथकाने या तीनही स्टेडियमची पाहणी केली. त्यांनी ही स्पर्धा पाकिस्तानातच होणार असल्याची पुष्टी केली आहे.

‘‘चॅम्पियन्स करंडकाचा दर्जा लक्षात घेता पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले. यासाठी आम्ही १२०० कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केले आहेत. नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे,’’ असे ‘पीसीबी’मधील सूत्राने सांगितले.

‘‘पाकिस्तानातील माध्यमांनी कोणतीही शहानिशा न करता स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या बातम्या देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या बातम्या खोट्या असल्याचे आम्हाला पुढे येऊन सांगावे लागले. अन्यथा ‘पीसीबी’, ‘आयसीसी’, पाकिस्तान सरकार, व्यावसायिक भागीदार आणि चाहते यांच्यात बराच गोंधळ निर्माण झाला असता. याचा तिकीट विक्री आणि मार्केटिंगवर मोठा परिणाम होण्याची भीती होती,’’ असेही सूत्राकडून सांगण्यात आले.

स्थानिक पत्रकाराने कोणत्याही पदाधिकाऱ्याची परवानगी न घेता कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये घुसत नूतनीकरणाच्या कामाचे चित्रीकरण केले होते. त्यानेच खोटी माहिती पसरवताना नकारात्मक चित्र तयार केले. मात्र, स्टेडियमच्या कामाबाबत कोणतीही चिंता नसल्याचे सूत्राने स्पष्ट केले. ‘‘स्टेडियममधील कामावर ‘पीसीबी’ आणि संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत. चॅम्पियन्स करंडकाची तयारी प्रगतिपथावर असून काम वेळेत पूर्ण होईल,’’ असे या सूत्राने सांगितले.

(पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी अन्य पदाधिकाऱ्यांसह स्टेडियमच्या नूतनीकरण कामाची पाहणी करताना.)

Story img Loader