scorecardresearch

Premium

Pakistan Cricket: दुखापतग्रस्त शादाब खानला नाही मिळाले स्ट्रेचर, चक्क खेळाडूला पाठीवरुन नेतानाचा Video व्हायरल

Shadab Khan Injured: पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान राष्ट्रीय टी-२० चषकादरम्यान जखमी झाला. रावळपिंडीचे कर्णधार असलेला शादाब जेव्हा सियालकोटविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला तेव्हा त्याला चक्क पाठीवरून बाहेर नेण्यात आले.

Strange Pakistan cricket stretcher not found for Shadab Khan PCB made fun of on social media
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान राष्ट्रीय टी-२० चषकादरम्यान जखमी झाला. सौजन्य- (ट्वीटर)

Shadab Khan Injured: पाकिस्तानचे क्रिकेटपटू त्यांच्या खेळापेक्षा त्यांच्या इतर कृत्यांमुळे चर्चेत राहतात. कधी स्वतःहून ट्रकमध्ये बॅग ठेवणे तर कधी ड्रेसिंग रूममध्ये सहकारी खेळाडूंशी वाद घालणे. पाकिस्तानी खेळाडूंशी संबंधित विचित्र बातम्या येत असतात. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शादाब खानला त्याचे साथीदार खांद्यावर घेऊन जात आहेत. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) खिल्ली उडवली जात आहे.

वास्तविक, पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान राष्ट्रीय टी-२० चषकादरम्यान जखमी झाला होता. रावळपिंडीचा कर्णधार असलेला शादाब जेव्हा सियालकोटविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला तेव्हा त्याला घेण्यासाठी स्ट्रेचर मैदानात आणले नाही. एका सहकारी खेळाडूने शादाबला खांद्यावर उचलून ड्रेसिंग रूममध्ये नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी पीसीबीवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुलभूत सुविधा नसल्याबद्दल त्यांनी पीसीबीला फटकारले.

Sajeevan Sajna hit a winning six off the last ball against Delhi Capitals
WPL 2024 : कोण आहे सजीवन सजना? जिच्या एका षटकाराने वेधले सर्व जगाचे लक्ष
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Rohit Sharma taunts Jadeja Video Viral
IND vs ENG : नो बॉलवरून रोहित शर्माचा जडेजाला टोमणा, लाईव्ह सामन्यात म्हणाला “अरे यार आयपीएलमध्ये तर…”
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?

कसा जखमी झाला शादाब खान?

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या नॅशनल टी-२० कपमध्ये रविवारी रावळपिंडी आणि सियालकोट यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये शादाब खान क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. शादाब खान रावळपिंडीचा कर्णधार आहे.

शादाबच्या घोट्याला दुखापत झाली

शादाब खानने सामन्यात दोन षटके टाकली आणि सात धावा दिल्या. क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला. सध्या फिजिओ त्याच्या दुखापतीकडे पाहत आहेत. पाकिस्तान सुपर लीगमधील शादाब खानचा संघ इस्लामाबाद युनायटेडने त्याच्या दुखापतीबाबत एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी सांगितले की, “क्षेत्ररक्षण करताना त्याचा घोटा मुरगळला. मात्र, ही दुखापत फारशी गंभीर नाही.”

हेही वाचा: IND vs SA: विश्वचषकातील खराब कामगिरीचा टेम्बा बावुमाला फटका, भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आफ्रिकन संघ जाहीर

शादाब खानचा संघ विजयी झाला

रावळपिंडी आणि सियालकोट यांच्यातील हा सामना कराचीमध्ये झाला. शादाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सियालकोटने २० षटकांत २ बाद १६३ धावा केल्या. त्यासाठी कर्णधार शोएब मलिकने सर्वाधिक नाबाद ८४ धावा केल्या. त्याने ५६ चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. आशीर महमूदने ५२ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. त्याने चार चौकार आणि चार षटकार मारले. रावळपिंडीने १८.४ षटकांत सात गडी गमावून १६७ धावा करून सामना जिंकला. त्यासाठी यासिर खानने ५२ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या. त्याने चार चौकार आणि सात षटकार मारले. सध्या पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेलेला आहे. त्यात शादाब खानला मात्र स्थान देण्यात आलेले नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pcbs poverty once again visible stretcher not found to carry injured player watch video avw

First published on: 04-12-2023 at 17:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×