ब्राझीलचे महान फुटबॉलपटू हे वेदनाशामक गोळ्यांना चांगला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. पेले यांच्यावर काही दिवसांपूर्वी मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. ‘‘१९७०मध्ये पेले यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्या वेळी त्यांची एक किडनी काढण्यात आली होती. पण त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना कोणतेही अडथळे येत नाहीत,’’ असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र पेले यांच्या प्रकृतीबाबत सध्या उलटसुलट चर्चाना पेव फुटले आहे. ‘‘मी गंभीर आजारी नाही. आता काही दिवस कुटुंबीयांसमवेत वेळ घालवण्याचा माझा विचार आहे,’’ असे पेले यांनी गुरुवारी ट्विटरवर म्हटले होते.