scorecardresearch

इंग्लंडच्या संघाला मिळाले खुर्च्या उचलण्याचे काम! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

England Cricket Team: १७ ऑगस्टपासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

इंग्लंडच्या संघाला मिळाले खुर्च्या उचलण्याचे काम! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
फोटो सौजन्य – ट्विटर

क्रिकेटच्या मैदानावर कधीकधी अतिशय मजेशीर प्रसंग घडतात. अशा प्रसंगाबद्दल क्रिकेट चाहत्यांना फार उत्सुकता असते. नुकताच इंग्लंड क्रिकेट संघाबाबत असाच एक प्रसंग घडला आहे. या प्रसंगाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये इंग्लंडच्या कसोटी संघातील खेळाडू खुर्च्या उचलून मैदानाबाहेर जाताना दिसत आहेत.

१७ ऑगस्टपासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पहिला कसोटी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लिश संघाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इंग्लिश संघाच्या चाहत्यांचा क्लब असलेल्या ‘बर्मी आर्मी’ने आपल्या अधिकृत अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्व इंग्लिश खेळाडू खुर्च्या उचलताना दिसत आहेत.

या फोटोबाबत क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्याही मालिकेपूर्वी संघाचा एक फोटो काढला जातो. ज्यामध्ये काही खेळाडू खुर्च्यांवर बसतात तर काही त्यांच्यामागे उभे राहतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघानेही असे फोटोशूट केले. त्यानंतर खेळाडूंनी स्वत: आपल्या खुर्च्या मैदानाबाहेर नेल्या. या प्रसंगाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटो शेअर होताच ट्विटरवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे, “लग्नात मी आणि माझे मित्र असेच खुर्च्या घेऊन भांडतो.”

हेही वाचा – इयान चॅपेलने पुन्हा घेतली निवृत्ती! ४५वर्षांच्या कारकिर्दीचा झाला शेवट

इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लिश संघाची दाणादाण उडवली आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका अनिर्णित ठेवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने टी २० मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Photo of england test cricket team carrying chairs goes viral vkk