प्रो कबड्डी लीगच्या ३७ व्या सामन्यात बंगळुरू बुल्सने जयपूर पिंक पँथर्सचा ३८-३१ असा पराभव केला आणि सात सामन्यांतील पाचव्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. बंगळुरू बुल्सच्या पवन सेहरावतने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत सामन्यात १८ गुण मिळवले आणि संघाच्या विजयात सर्वात मोठा वाटा उचलला. जयपूर पिंक पँथर्सचा सहा सामन्यांमधला हा चौथा पराभव असून ते दहाव्या स्थानावर आहेत.

पवन सेहरावतचा आणखी एक सुपर १०

CSK vs KKR Highlights Cricket Score in Marathi
IPL 2024 CSK vs KKR Highlights: ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेचा शानदार विजय, केकेआरवर ७ विकेट्सनी केली मात
Rajasthan beat RCB by 6 wickets
RR vs RCB : राजस्थान रॉयल्सने रचला इतिहास! आयपीएलच्या दोन हंगामात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 SRH vs CSK: सनरायझर्सचा तळपता विजय; चेन्नईला केलं चीतपट
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Match UpdateS
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय, रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव

पूर्वार्धात पवन सेहरावतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बेंगळुरू बुल्सने २०-१४ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात पवन सेहरावतने मोसमातील आपला पाचवा सुपर १० पूर्ण केला आणि जयपूर पिंक पँथर्स एकदाच ऑलआउट झाला. पवन सेहरावतने पहिल्या सत्रात १३ रेड आणि १ टॅकल पॉइंटच्या मदतीने १४ गुण मिळवले.

हेही वाचा – Pro Kabaddi League : तामिळ थलायवासनं पाटणाला बरोबरीत रोखलं; अजिंक्य पवारची चमकदार कामगिरी!

उत्तरार्धातही बंगळुरू बुल्सने आपली आघाडी कायम ठेवली आणि जयपूर पिंक पँथर्सला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. सामन्याच्या शेवटच्या क्षणी बंगळुरू बुल्स संघ ऑलआऊट झाला होता, तरीही त्यांनी ७ गुणांनी विजय मिळवला. अर्जुन देशवालने सलग सहावे सुपर १० पूर्ण केले परंतु १२ गुण घेऊनही संघाला एकतर्फी पराभवापासून वाचवता आले नाही.

पवन सेहरावत व्यतिरिक्त, सौरभ नंदल आणि जीबी मोरे यांनी बेंगळुरू बुल्सच्या बचावात प्रत्येकी ३ गुण कमावले आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.