रंगतदार झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या (PKL) ६१व्या सामन्यात गतविजेत्या बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सचा २८-२७ असा पराभव केला. रोमांचक लढतीत बंगालच्या मनिंदर सिंगने १० गुण घेत संघाच्या विजयात बहुमुल्य योगदान दिले. तर रण सिंहने बचावात ४ गुण घेतले. टायटन्स संघाकडून रजनीश दलालने ११ गुण घेतले खरे, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

टायटन्स विरुद्ध बंगाल सामन्याचा पूर्वार्ध अत्यंत संथ होता. बंगालने पूर्वार्धात एका गुणाची आघाडी घेतली होती. दोन्ही संघांच्या बचावफळीला प्रत्येकी सहा टॅकल पॉइंट मिळाले. पूर्वार्धात संयमी राहिलेल्या मनिंदर सिंगने उत्तरार्धात शानदार पुनरागमन केले आणि टायटन्स संघासाठी सलग नववा सुपर-१० पूर्ण केला. त्याच्या या कामगिरीने बंगालला अंतिम क्षणांमध्ये तीन गुणांची आघाडी मिळवून दिली.

job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
gujarat giants
WPL 2024 : गुजरात जायंट संघाला मिळालीय ‘ही’ विशेष परवानगी; जाणून घ्या कारण…
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

हेही वाचा – Pro Kabaddi League : मोक्याच्या क्षणी यूपी योद्धानं मारली मुसंडी..! पुणेरी पलटणचा आणखी एक पराभव

रजनीशने घेतलेल्या ११ गुणांमधील ७ गुण बोनस म्हणून घेतले. आकाश आणि संदीप कंडोला यांना प्रत्येकी चार टॅकल पॉइंट मिळाले. १० सामने खेळलेला तेलुगू टायटन्सला अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यांनी ८ सामन्यात पराभव पाहिला असून २ सामन्यात बरोबरी पत्करली आहे. ते गुणतालिकेत सर्वात तळाशी आहेत.