अटीतटीच्या झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात दबंग दिल्लीने बलाढ्य पाटणा पायरेट्सला ३७-३६ अशी धूळ चारली आणि विजेतेपद पटकावले. स्टार रेडर नवीन कुमार आणि बचावपटू मनजित चिल्लर यांनी अप्रतिम कामगिरी करत संघाला पहिल्यांदाच चॅम्पियन बनवले. पाटणा संघाचे चौथ्यांदा जेतेपद मिळवण्याचे स्वप्न धूळीस मिळाले.

तीन वेळचा चॅम्पियन संघ पाटणा संघाने उपांत्य फेरीत यूपी योद्धाचा तर दिल्लीने बंगळुरू बुल्सचा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. शेष म्हणजे साखळी फेरीत दिल्लीविरुद्धच्या दोन्ही लढतींमध्ये पाटणा संघाला संघर्ष करावा लागला. साखळी फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये दिल्लीने पाटणाचा पराभव केला. दिल्ली संघाचे नेतृत्व जोगिंदर नरवालकडे., तर पायरेट्सचे नेतृत्व रेडर प्रशांत कुमारकडे होते.

Rohit Sharma Yashasvi Jaiswal Emotional Video With Vadalvat Title Song
रोहित शर्मा व यशस्वीचा Video पाहून मराठी प्रेक्षक भावुक; ‘हे’ शब्द ऐकून म्हणाले, “भावा मन जिंकलंस”, तुम्हीही बघा
jaiswal
जैस्वालला सूर गवसणार? राजस्थान रॉयल्ससमोर आज गुजरात टायटन्सचे आव्हान
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: पंजाब कब जिता है? शशांक सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबची गुजरातवर मात

हेही वाचा – IND vs SL : कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेच्या १८ सदस्यीय संघाची घोषणा!

पूर्वार्धापर्यंत पाटणा संघाने दोन गुणांची आघाडी घेतली होती. पाटणाने सुरुवातीच्या सत्रात चांगली कामगिरी केली आणि एका क्षणी ४ गुणांची आघाडी घेतली. दिल्लीनेही पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पूर्वार्धापर्यंत गुणफलक १७-१५ असा पाटणाच्या बाजूने होता. पूर्वार्धात, दोन्ही संघांनी चढाईतून १२-१२ गुण मिळवले तर टॅकलमधून २-२ गुण मिळवले.

उत्तरार्धाच्या सुरुवातीला दबंग दिल्लीला पाटणा पायरेट्सला ऑलआऊट करण्याची संधी होती, मात्र सचिन तन्वरने आपल्या संघाची आघाडी कमालीची वाढवली. त्याला आधी रेड टाकताना दोन गुण मिळाले आणि नंतर त्याने नवीन कुमारचाही सामना केला. दिल्लीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुमान सिंगने मल्टी पॉइंट रेड करत आपल्या संघाला दिलासा दिला आणि नंतर शाडलूने नवीन कुमारला टॅकल करताना बाद केले. दबंग दिल्लीच्या बचावफळीनेही अतिशय कमकुवत खेळ दाखवला आणि त्यामुळे त्यांचे बरेच नुकसान झाले. विजय मलिकने निर्णायक क्षणी पायरेट्सला सुपर रेड करत धक्का दिला.

नवीन कुमारने अंतिम फेरीतही सुपर १० पूर्ण केले आणि प्रत्येक प्लेऑफ सामन्यात त्याने सुपर १० पूर्ण केले. गुमान सिंगने पुन्हा एकदा आपल्या संघाला ऑलआऊटपासून वाचवले. त्याने बोनससह टच पॉइंट मिळवून पटना पायरेट्सला दिलासा दिला. दबंग दिल्लीने अखेर सामन्याच्या ३४व्या मिनिटाला पायरेट्सला प्रथमच ऑलआऊट केले. पाटणा पायरेट्सच्या संघ व्यवस्थापनाने मोठी चूक केली आणि त्यांचा बदली संघ संपवला. त्याचे तीन रेडर सचिन तन्वर, गुमान सिंग आणि प्रशांत कुमार राय हे शेवटच्या ६ मिनिटांत सामन्यात सहभागी होऊ शकले नाहीत. दरम्यान, विजय मलिकने आणखी एका सुपर रेडसह सुपर १० पूर्ण केला. शाडलूने सलग गुण आणून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेरीस नवीन कुमारने आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

या सामन्यात दबंग दिल्लीच्या विजय मलिकने सर्वाधिक १४ गुण मिळवले. नवीन कुमारनेही १३ रेड केल्या. सचिन तन्वर आणि गुमान सिंग यांनी पटना पायरेट्सकडून चढाई करताना ९-९ गुण मिळवले. पायरेट्सचे मुख्य रेडर्स जर या सामन्यात सहभागी झाले असते तर त्यांना हा सामना नक्कीच जिंकता आला असता.