scorecardresearch

Premium

PKL 2022 Semifinal : पवन सेहरावतच्या बंगळुरू बुल्सची एक्झिट; दिल्ली फायनलमध्ये!

सेमीफायनलमध्ये दबंग दिल्लीने बंगळुरू बुल्सला ४०-३५ अशी मात दिली.

PKL 2022 Semifinal Dabang Delhi K.C vs Bengaluru Bulls
प्रो कबड्डी लीग

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात दबंग दिल्लीने फायनलमध्ये प्रवेश नोंदवला आहे. रंगतदार झालेल्या सेमीफायनलमध्ये दिल्लीने बंगळुरू बुल्सला ४०-३५ अशी मात देत आपणच दबंग असल्याचे सांगितले. स्पर्धेत तुफान फॉर्मात खेळणाऱ्या पवन सेहरावतच्या बंगळुरू संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत दिल्लीला पाटणा पायरेट्सशी भिडावे लागणार आहे. २५ फेब्रुवारीला हा सामना खेळवला जाईल.

दबंग दिल्लीने बुल्सला प्रथम रेडसाठी आमंत्रित केले. सामन्याच्या पहिल्या रेडमध्ये पवन सेहरावतने संघाचे खाते उघडले, त्यानंतर बुल्सने नवीन कुमारला टॅकल करत दुहेरी आघाडी मिळवली. चंद्रन रणजीतला जीवा कुमार आणि संदीप नरवाला यांनी टॅकल करून स्कोअर ३-३ असा बरोबरीत आणला. यानंतर दिल्लीने दमदार खेळ दाखवत बुल्सला ऑलआऊटच्या जवळ आणले. त्यानंतर विजय मलिकच्या टॅकल आणि पवन सेहरावतच्या एका पॉइंटच्या जोरावर बुल्सने स्कोअर १०-१० असा केला. पवनने आणखी एक गुण घेत सुपर १० पूर्ण केला. यानंतर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली आणि स्कोअर १४-१४ असा बरोबरीत राहिला. पूर्वार्धाच्या शेवटच्या चढाईत मनजीत चिल्लरने टॅकल केले आणि एका गुणाची आघाडी घेतली. २० मिनिटे संपल्यानंतर बुल्स १७-१७ने आघाडीवर होते.

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

हेही वाचा – PKL 2022 Semifinal : पाटणा पायरेट्सची फायनलमध्ये धडक!

उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच कृष्णा धुलने पवन सेहरावतला धूळ चारत दिल्लीला आघाडी मिळवून दिली. यानंतर मनजीत चिल्लरने भरतला टॅकल करत दिल्लीला २२-१८ अशी आघाडी मिळवून दिली. जयदीप आणि महेंद्रसिंग यांनी नवीनला सुपर टॅकल केले आणि पवनला मॅटवर परत आणले. पवन येताच बुल्सला १६ मिनिटांनी आलेल्या रेडमध्ये एक पॉइंट मिळाला. नीरज नरवालने सुपर रेड करत दिल्लीला पुन्हा पुढे केले. या सुपर रेडमध्ये सौरभ नंदल, अमन आणि पवन सेहरावत यांना मॅटमधून बाहेर पडावे लागले. नवीनने भरतला सलग दोनदा बाद करून संघाला ३१-२४ अशी आघाडी दिली. ३३व्या मिनिटाला नवीनने सुपर रेड करत दिल्लीचे अंतिम तिकीट जवळपास बुक केले. नवीनने आणखी एक मल्टी रेड करत सुपर १० पूर्ण केला.

मागील हंगामातही दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, मात्र तिथे त्यांना बंगाल वॉरियर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात बुल्सने धमाकेदार सुरुवात केली परंतु लवकरच दिल्लीने पुनरागमन केले आणि आघाडी घेतली. या सामन्यात सौरभ नंदलला ४ टॅकल पॉइंट मिळाले, तर महेंद्रसिंगने तीन खेळाडूंना बाद केले. पवन सेहरावतने या सामन्यात सर्वाधिक १५ रेड पॉईंट्स केले, तर नवीन कुमारने ११ गुण मिळवत दिल्लीला अंतिम फेरीत नेले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pkl 2022 semifinal dabang delhi k c vs bengaluru bulls adn

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×