प्रो कबड्डी लीगचा ५५वा सामना हरयाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात खूपच रोमांचक पद्धतीने पार पडला. दबंग दिल्लीने हरयाणा स्टीलर्सचा २८-२५ असा पराभव करत दणदणीत विजय नोंदवला. यासह ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आले आहेत, तर हरयाणा स्टीलर्सचा संघही सातव्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वार्धानंतर दोन्ही संघ ११-११असे बरोबरीत होते. हरयाणा स्टीलर्सने नवीन कुमारला चांगले खेळू दिले नाही. त्याला ४ वेळा बाद केले. दरम्यान, नवीन कुमारला दोन बोनस गुणांसह केवळ तीन गुण मिळवता आले. असे असतानाही दबंग दिल्लीने हरयाणा स्टीलर्सला वरचढ होऊ दिले नाही. हरयाणाचा कर्णधार विकास कंडोलाही अपयशी ठरला. दिल्लीकडून विजयने ४, तर हरयाणा स्टीलर्सकडून मीतू महेंद्रने ३ गुण मिळवले.

विजयने सुपर रेड टाकत सामन्यात सर्वाधिक गुण मिळवले. नवीन कुमारला सामन्यात केवळ ५ गुण मिळाले, तर विकास कंडोलाला केवळ ३ गुण मिळाले. बचावात मनजीत चिल्लरने सर्वाधिक ३ गुण मिळवले.

हेही वाचा – विराटनं टेस्ट कॅप्टनशिप सोडली अन् धोनीची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!

दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धाने तेलुगू टायटन्सला ३९-३३ असे हरवले. मागील काही सामन्यात अपयशी ठरत असलेल्या परदीप नरवालला अखेर सूर गवसला. त्याने यूपी योद्धासाठी १० गुण घेतले, तर श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल आणि नितीश कुमार यांनी प्रत्येकी ७ गुण घेत त्याला उत्तम साथ दिली. टायटन्सकडून रजनीश दलाल आणि अंकित बेनिवाल यांनी प्रत्येकी ९ गुण घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pkl haryana steelers vs dabang delhi and up yoddha vs telugu titans adn
First published on: 15-01-2022 at 22:01 IST