Pro Kabaddi League : पुणेरी पलटणवर हरयाणा वरचढ; तेलुगू टायटन्सनं नोंदवला पहिला विजय!

हरयाणा स्टीलर्सने पुणेरी पलटणचा ३७-३० असा पराभव केला.

PKL Haryana Steelers vs Puneri Paltan and Jaipur Pink Panthers vs Telugu Titans
प्रो कबड्डी लीग

प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ६४व्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सने पुणेरी पलटणचा ३७-३० असा पराभव केला. हरयाणा स्टीलर्सचा हा चौथा विजय आहे. दुसरीकडे पुणेरी पलटण २२ गुणांसह गुणतालिकेत ११व्या स्थानावर आहे. तसेच अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील पुणे संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

हरयाणा स्टीलर्सच्या जयदीप आणि मोहितने उत्कृष्ट कामगिरी करत हाय-५ पूर्ण केले. दोघांनी टॅकलद्वारे ७-७ गुण मिळवले. त्याच्याशिवाय पुणेरी पलटणच्या संकेत सावंतने ३ टॅकल गुण मिळवले. रेडिंगमध्ये विकास कंडोलाने ८ आणि विश्वासने ७ गुण मिळवले.

हेही वाचा – अरे बापरे..! टीम इंडियाच्या ६ क्रिकेटपटूंना करोनाची लागण; कॅप्टनही आढळला पॉझिटिव्ह!

दुसऱ्या सामन्यात तेलुगू टायटन्सने स्पर्धेतील आपला पहिलावहिला विजय नोंदवला. रोमहर्षक सामन्यात त्यानी जयपूर पिंक पँथर्सचा ३५-३४ असा पराभव केला. जयपूरच्या अर्जुन देशवालने सामन्यात सर्वाधिक १३ गुण घेतले. तर दीपक निवास हुडाने ८ गुणांची कमाई केली. टायटन्स संघाकडून आदर्शने ९ तर रजनीश दलालने ७ गुण घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pkl haryana steelers vs puneri paltan and jaipur pink panthers vs telugu titans adn

Next Story
U 19 WC :अरे बापरे..! टीम इंडियाच्या ६ क्रिकेटपटूंना करोनाची लागण; कॅप्टनही आढळला पॉझिटिव्ह!
फोटो गॅलरी