पाटणा पायरेट्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ११६व्या सामन्यात तेलुगू टायटन्सचा ३८-३० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटणा पायरेट्सचा १९ सामन्यांमधला हा १४ वा आणि स्पर्धेतील सलग सहावा विजय आहे. दुसरीकडे, तेलुगू टायटन्सचा २० सामन्यांमधील हा १५वा पराभव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या हाफनंतर पाटणा पायरेट्स २१-२० असा पुढे होता. पायरेट्सने सातव्या मिनिटालाच तेलुगू टायटन्सला ऑलआऊट केले, यानंतर टायटन्सने जबरदस्त पुनरागमन केले आणि १८व्या मिनिटाला पटना पायरेट्सला ऑलआऊट करत सामन्यात आघाडी घेतली. मात्र, पुढच्या दोन मिनिटांत पाटणाने पुन्हा दोन गुणांसह सामन्यात आघाडी घेतली.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला सचिनने सुपर १० पूर्ण केला. मोक्याच्या वेळी तेलुगू टायटन्सने २७-२६ अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर पायरेट्सने सलग गुणांसह आघाडी घेतली आणि त्यानंतर शेवटच्या १० मिनिटांत तेलुगू टायटन्सला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. पायरेट्ससाठी सचिनने १४ गुण मिळवले, तर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मदराझा शाडलूने हाय ५ पूर्ण केला. रजनीशने तेलुगू टायटन्ससाठी सुपर १० मारला पण दुसऱ्या हाफमध्ये तो फक्त एकच गुण घेऊ शकला.

हेही वाचा – IND vs WI : पहिल्या टी-२० मॅचपूर्वी टीम इंडियाला धक्का; ‘स्टार’ खेळाडू पडला मालिकेबाहेर!

प्रो कबड्डी लीगच्या ११७व्या सामन्यात, यूपी योद्धाने दबंग दिल्लीचा ४४-२८ असा पराभव करत गुणतालिकेत जबरदस्त झेप घेतली आणि तिसरे स्थान गाठले. परदीप नरवालने सामन्यात चमकदार कामगिरी करत सुपर १० आणि १४ रेड पॉइंट घेतले. दबंग दिल्लीचा २० सामन्यांमधला हा सहावा पराभव आहे, तरीही ते दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pkl patna pirates vs telugu titans and dabang delhi vs up yoddha adn
First published on: 14-02-2022 at 22:22 IST