बेंगळूरु : प्रो कबड्डी लीगच्या जैव-सुरक्षित परिघामध्ये करोनाचा शिरकाव झाल्यामुळे आयोजकांना सामन्यांच्या वेळापत्रकात तातडीने बदल करावे लागले आहेत. दोन संघ कोणते आणि नेमक्या किती खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
‘‘प्रो कबड्डीच्या साखळी स्तरावरील पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन संघांमधील काही खेळाडूंची करोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे या संघांना सामन्यासाठी १२ तंदुरुस्ती खेळाडू उपलब्ध करणे कठीण झाले आहे. त्यामुळे २५ ते ३० जानेवारी या कालावधीतही काही सामन्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. करोनाबाधित खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे,’’ असे प्रो कबड्डीचे संयोजक मशाल स्पोर्ट्सने सांगितले.
वेळापत्रकातील बदल
’ २५ जानेवारी : हरयाणा स्टीलर्स वि. तेलुगू टायटन्स
’ २६ जानेवारी : यू मुंबा वि.
बेंगळूरु बुल्स
’ २७ जानेवारी : यूपी योद्धा वि.
पुणेरी पलटण
’ २८ जानेवारी : पाटणा पायरेट्स वि. तमिळ थलायव्हाज
’ २९ जानेवारी : दबंग दिल्ली वि. गुजरात जायंट्स, तेलुगू टायटन्स वि. बंगाल वॉरियर्स
’ ३० जानेवारी : जयपूर पिंक पँथर्स वि. पाटणा पायरेट्स, बेंगळूरु बुल्स वि. तमिळ थलायव्हाज