Varanasi International Cricket Stadium: पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करणार आहेत. हे देशातील ५४वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. आत्तापर्यंत भारतात ५३ वेगवेगळ्या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, यातील बहुतांश स्टेडियम आता बंद झाले असून काहींचे नूतनीकरण सुरू आहे. पीएम मोदी जेव्हा स्टेडियमची पायाभरणी करतील तेव्हा सचिन तेंडुलकरसह अनेक क्रिकेटपटूही उपस्थित असतील.

भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी एक फोटो शेअर करत वाराणसीतील क्रिकेट स्टेडियमच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. या फोटोत रवी शास्त्रीसोबत सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकरही दिसत आहेत. हा फोटो शेअर करत रवी शास्त्री यांनी लिहिले, “मुंबई ते वाराणसी एक उत्तम सहल झाली. भारतातील क्रिकेटचे महान लोक आणि सहकाऱ्यांसोबतची ही एक चांगली सहल मला अनुभवता आली. इथे फक्त काही आंतरराष्ट्रीय धावा आणि विकेट्स घेतलेल्या जगातील दिग्गज खेळाडू आहेत. त्यांच्याबरोबर काढलेले हे आयुष्यभराचे फोटो छान आठवणी देऊन जातील.”

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
marathi actor atul kulkarni
वेडी आशा
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर

वाराणसीच्या गंजरी येथे हे स्टेडियम ४५० कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या पायाभरणी समारंभाला क्रिकेट जगतातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, कपिल देव, रवी शास्त्री यांच्यासह अनेक क्रिकेटपटू येत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पायाभरणी समारंभानंतर क्रिकेटचे दिग्गज श्री काशी विश्वनाथ धामला भेट देतील.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बांधकाम आणि भूसंपादनासाठी १२१ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. याच्या व्यतिरिक्त स्टेडियमच्या बांधकामासाठी बीसीसीआय ३३० कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे उत्तरप्रदेश राज्याला तिसरे स्टेडियम मिळेल. याआधी कानपूर येथील ग्रीन पार्क आणि लखनऊचे अटलबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये अनेक आंतरराष्ट्रीय झाले आहेत.

हेही वाचा: IND vs AUS: ‘मिस्टर ३६०’ फॉर्ममध्ये परतला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने झळकावले तिसरे अर्धशतक; श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात

वाराणसीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये महादेव आणि काशीची झलक पाहायला मिळणार आहे. या स्टेडियमची थीमॅटिक वास्तुशिल्प भगवान शिवापासून प्रेरणा घेते, ज्यामध्ये चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आच्छादन, त्रिशूळ-आकाराचे फ्लडलाइट्स, घाटाच्या पायऱ्यांवर आधारित बसण्याची व्यवस्था आणि दर्शनी भागावर बिल्वपत्राच्या आकाराचे धातूचे पत्रे तयार करण्यात आले आहेत. स्टेडियमची क्षमता ३०,००० प्रेक्षकांची असेल. तेंडुलकर, गावसकर, शास्त्री, वेंगसरकर असे दिग्गज खेळाडू पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव जय शाह यांच्यासह प्रमुख लोक उपस्थित राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याशिवाय पायाभरणी समारंभाला अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.